शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! भेसळयुक्त दूध प्यायल्याने १३ जणांचा मृत्यू; आंध्र प्रदेशातील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 10:05 IST

Andhra Pradesh Adulterated Milk Deaths: आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात भेसळयुक्त दुधामुळे १३ जणांचा बळी गेला आहे. दुधात युरियाची भेसळ असल्याचा संशय असून अनेक जण रुग्णालयात दाखल आहेत. वाचा सविस्तर वृत्त.

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. कथितरीत्या भेसळयुक्त दूध प्यायल्यामुळे तब्बल १३ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. या भीषण प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून अन्न सुरक्षा विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कोरुकोंडा मंडल क्षेत्रातील एका गावात ही घटना घडली. २२ फेब्रुवारीच्या सुमारास काही वृद्धांना उलट्या, पोटदुखी आणि लघवी होण्यास त्रास होऊ लागला. प्राथमिक तपासात या रुग्णांच्या किडनीमध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले, ज्यासाठी तातडीने डायलिसिसची गरज भासली. अधिक तपास केला असता, या सर्वांनी एकाच डेयरीतून दूध खरेदी केल्याचे समोर आले.

दुधामध्ये युरियाची भेसळ?अन्न सुरक्षा विभागाने 'वरलक्ष्मी मिल्क डेयरी'तून दुधाचे नमुने गोळा केले होते. तपासणीत या दुधामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झाले आहे. बाधितांच्या रक्त आणि लघवीच्या चाचणीत युरिया आणि सीरम क्रिएटिनिनचे प्रमाण धोकादायक पातळीवर आढळले आहे. या डेयरीने परिसरातील सुमारे १०६ कुटुंबांना दूध पुरवठा केला होता.

प्रशासनाची कारवाईसंबंधित डेयरी युनिट तात्काळ सील करण्यात आले आहे. संशयित आरोपी अड्डाला गणेश्वरराव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.बाधित भागात आपत्कालीन वैद्यकीय शिबिरे लावण्यात आली असून रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात केली आहे. या घटनेनंतर केवळ आंध्र प्रदेशच नव्हे, तर शेजारील तेलंगणा राज्यातही दुध डेअरींची तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Adulterated Milk Kills 13 in Andhra Pradesh; Outrage Ensues

Web Summary : Thirteen people died and eleven are critically ill in Andhra Pradesh after consuming adulterated milk. Investigations revealed urea contamination in milk supplied by a dairy. The dairy has been sealed, the owner arrested, and medical camps are set up in the affected area.
टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशmilkदूध