Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 09:28 IST2025-12-12T09:27:35+5:302025-12-12T09:28:08+5:30
Andhra Pradesh Accident: आंध्र प्रेदशात देवदर्शनासाठी निघालेल्या बसला भीषण अपघात घडला.

Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील घाट रोडवर आज पहाटे एका बसला भीषण अपघात झाला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात ९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर २२ जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात चिंतुरू आणि भद्राचलम दरम्यान घडला. ही बस भद्राचलम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर अन्नावरम येथील मंदिराकडे जात होती. बसमध्ये एकूण सुमारे ३५ प्रवासी प्रवास करत होते.
आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास बस घाट रोडवरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरून खाली कोसळली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.