शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

अंदमानातील आदिवासींनी केली अमेरिकन नागरिकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 3:39 PM

अंदमानमधील आदिवासी जमातीने एका अमेरिकन नागरिकाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

अंदमान - अंदमानमधील आदिवासी जमातीने एका अमेरिकन नागरिकाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकऱणी पोलिसांनी कारवाई करत सात जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख उघड करण्यात आलेली नाही, मात्र त्यांचा संबंध येथील सेंटिनेलिस आदिवासी समुदायाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

या अमेरिकन नागरिकाने आदिवासींच्या भागामध्ये घुसखोरी केल्याने त्याला ठार मारण्यात आले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अंदमान बेटांच्या समुहातील सेंटिनेंल नावाच्या बेटावर सेंटिनेलिस आदिवासी जमातीचे वास्तव्य असून, या बेटांवर जाण्यास सर्वसामान्य व्यक्तींना मनाई आहे. मात्र हा अमेरिकन नागरिक मच्छिमारांच्या मदतीने बेकायदेशीररीत्या या बेटांवर गेला होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. या अमेरिकन नागरिकाची तीर मारून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  हत्या करण्यात आलेल्या अमेरिकन नागरिकाची ओळख जॉन अॅलन चाऊ अशी झाली आहे. तसेच त्याचा मृतदेह उत्तर सेंटिनल बेटांवर सापडला आहे. या मृतदेहाबाबत स्थानिक मच्छिमारांनी पोलिसांना माहिती दिली होती. सेंटिनल द्विपावर राहणारी आदिवासी जमात धोकादायक मानली जाते.या संदर्भात चेन्नई येथील दुतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अंदमान निकोबार बेटांवर एका अमेरिकन नागरिकाची हत्या झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही या प्रकरणी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत. मात्र गोपनीयतेची बाब असल्याने आम्ही याबाबत अधिक काही माहिती शकत नाही."  आंदमानातील सेंटिनल हे बेट सेंटिनेलिस या आदिवासी जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. येथील आदिवासी बाहेरील जगातील कुठल्याही व्यक्तींशी संपर्क साधत नाही. ही जमात सुमारे 60 हजार वर्षे जुनी असून, ते अद्यापही नैसर्गिक अवस्थेत राहतात. उत्तर सेंटिनल बेटांवरील या जमातीला आधुनिक जगाशी कोणत्याही प्रकारचे देणेघेणे नाही. तसेच ते बाहेरील लोकांनाही आपल्याशी कोणताही संपर्क ठेवू देत नाहीत. तसा प्रयत्न कुणी केल्यास ते त्यांच्यावर हल्ला करतात.  

टॅग्स :IndiaभारतUnited Statesअमेरिका