आनंद महिंद्रांनी ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ, पण त्यात केली मोठी चुक...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 07:52 PM2021-08-27T19:52:42+5:302021-08-27T19:53:09+5:30

Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रांच्या व्हिडिओ चाहते वाट पाहत असतात.

Anand Mahindra shared the video on Twitter, but made a big mistake | आनंद महिंद्रांनी ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ, पण त्यात केली मोठी चुक...

आनंद महिंद्रांनी ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ, पण त्यात केली मोठी चुक...

Next

उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या ट्विटरवर विविध व्हिडिओ शेअर करत असतात. आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर  चाहते तुटून पडतात. पण, आता आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये मोठी चुक केली आहे.

आनंद महिंद्रांनी ट्विटरवर कलारीपयट्टू खेळाचा सराव करणाऱ्या एका मुलाचा व्हिडिओ पोस्ट केला. पण, आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी एक चुक केली. व्हिडिओ पाहून त्यांना व्हिडिओत मुलगी असल्याचं वाटलं आणि कॅप्शनमध्ये मुलाचा मुलगी असा उल्लेख केला. 

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ केरळमधील एकवीरा कलरीपयट्टू अकादमीतील असलेल्या नीलकंदन नायर या मुलाचा आहे. नीलकंदन यानं मुलींप्रमाणे लांब केस वाढवल्यामुळे आनंद महिंद्रा त्याला मुलगी समजले आणि त्याचा मुलगी असा उल्लेख केला. पण, नीलकंदननं त्यंच्या पोस्टला उत्तर देत, मी मुलगी नाही, मी 10 वर्षांचा मुलगा आहे, असं सांगितलं.

काय आहे कलारीपयट्टू ?
आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडिओतील कलेविषयी माहिती असणं आवश्यक आहे. कलारीपयट्टू, एक प्राचीन मार्शल आर्ट फॉर्म आहे. कलारीपयट्टूला कलारी म्हणूनही ओळखलं जातं. कलारीपयट्टू प्रकार त्या काळात युद्धांसाठी तयार करण्यात आला आहे. या प्रकारात खंजीर, काठ्या आणि तलवारींचा वापर होतो. व्हिडिओमध्ये, नीलकंदन नायर लांब काठीनं कलरीपयट्टूचा सराव करतात दिसत आहे.
 

Web Title: Anand Mahindra shared the video on Twitter, but made a big mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.