शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: विमानतळावर वृद्धाला हार्ट ॲटॅक; डॉक्टर तरुणीने CPR देऊन वाचवले प्राण, कौतुकाचा वर्षाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 12:22 IST

डॉक्टर तरुणीने दिलेल्या सीपीआरचा सकारात्मक परिणाम झाला आणि काही वेळाने हार्ट ॲटॅक आलेल्या वृद्धाला शुद्ध आली.

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका वृद्ध व्यक्तीला हार्ट ॲटॅक आल्यानंतर तिथं असणाऱ्या डॉक्टर तरुणीने सीपीआर देत त्याचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे. Rishi Bagree नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर डॉक्टर तरुणीवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओनुसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-२ इथं एका ६० वर्षीय व्यक्तीला हार्ट ॲटॅक येऊन ती व्यक्तीच जागीच कोसळली. या वृद्धाची अवस्था पाहून आजूबाजूचे नागरिक गोंधळले. मात्र तिथं उपस्थित असणाऱ्या डॉक्टर तरुणीच्या हा प्रकार लक्षात येताच तिने ताबडतोब सदर व्यक्तीला सीपीआर देण्यास सुरुवात केली. तसंच विमानतळावरील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी आवाज दिला. डॉक्टर तरुणीने दिलेल्या सीपीआरचा सकारात्मक परिणाम झाला आणि काही वेळाने हार्ट ॲटॅक आलेल्या वृद्धाला शुद्ध आली.

दरम्यान, कामाच्या घाईगडबडीत अनेकदा अशा घटनांकडे दुर्लक्ष करून लोक पुढे जातात. मात्र नवी दिल्ली येथील विमानतळावर डॉक्टर तरुणीने प्रसंगावधान दाखवत एका व्यक्तीचे प्राण वाचवल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

"या तरुणीने अक्षरश: यमराजकडून वृद्धाचे प्राण हिसकावून आणले आहेत. तिचा मला अभिमान वाटतो," अशी प्रतिक्रिया 'एक्स'वरील या व्हिडिओखाली एका यूजरने दिली आहे. तसंच दुसऱ्या एका यूजरने म्हटलं आहे की, "संकटाच्या स्थितीत लोक मदत करण्यासाठी पुढे येतात, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आपल्या संस्कृतीला सलाम आणि डॉक्टर तरुणीला धन्यवाद." 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाViral Photosव्हायरल फोटोज्New Delhiनवी दिल्लीdoctorडॉक्टर