तिची विवस्त्र धिंड काढली; लोकांनी व्हिडीओ काढले; पोलिसांनी सात जणांना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 09:11 IST2023-09-03T09:11:09+5:302023-09-03T09:11:26+5:30

राजस्थानमधील धक्कादायक घटना

An incident of stripping a 21-year-old tribal woman in Rajasthan has come to light | तिची विवस्त्र धिंड काढली; लोकांनी व्हिडीओ काढले; पोलिसांनी सात जणांना केली अटक

तिची विवस्त्र धिंड काढली; लोकांनी व्हिडीओ काढले; पोलिसांनी सात जणांना केली अटक

जयपूर : राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात २१ वर्षीय आदिवासी महिलेची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे, तर चार जणांना ताब्यात घेतले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली.

वर्षभरापूर्वी महिलेचे लग्न झाले होते. मात्र, ती दुसऱ्या पुरुषासोबत राहत होती. याचा राग येत पतीसह सासरच्या लोकांनी गाव गाठून महिलेला घराबाहेर काढले आणि विवस्त्र केले. त्यानंतर तिला गावात फिरवण्यात आले. यावेळी लोक तिच्याकडे केवळ पाहत राहिले. काही व्हिडीओ काढत होते. यात महिलांचाही समावेश होता, असे पोलिसांनी सांगितले.

कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. मुख्य आरोपी कान्हा, नेतिया, बेनिया, पिंटू आणि एक अल्पवयीन याशिवाय गुन्ह्यातील साक्षीदार पुनिया, खेतिया आणि मोतीलाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: An incident of stripping a 21-year-old tribal woman in Rajasthan has come to light