शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याच्या हत्येला नर्स देत होती आत्महत्येचा रंग; १३ वर्षांच्या मुलीने उघड केले वडिलांच्या हत्येचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 16:39 IST

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका नर्सने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे.

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका नर्सने आपल्या पतीची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्येला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र आरोपी नर्सच्या १३ वर्षांच्या मुलीने या हत्येचे संपूर्ण रहस्य पोलिसांसमोर उघड केले आहे. पोलिसांनी संबंधित नर्सच्या मोबाईलची झडती घेतल्यानंतर तिला तिच्या प्रियकरासह अटक केली आहे. 

दरम्यान, पोलिसांना रूग्णालयातून माहिती मिळाली होती की एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शवविच्छेदन केले असता मृताच्या गळ्यावर काही खुणा असल्याचे दिसून आले. कोणीतरी गुदमरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे या खुणा दर्शवत होत्या. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि मृत व्यक्तीच्या पत्नीची चौकशी सुरू केली.

मुलीने वडिलांच्या हत्येचे रहस्य केले उघड पोलिसांच्या चौकशीदरम्यान, महिलेने हत्येचा आरोप फेटाळला, मात्र तिच्या १३ वर्षांच्या मुलीने हत्येची संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली. मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिने स्वत: आईने वडिलांच्या चेहऱ्यावर उशी ठेवून त्याची हत्या करताना पाहिले आहे. यानंतर पोलिसांनी पुन्हा कविता या नर्सला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली. या चौकशीत कविताने हत्येची कबुली दिली.

पतीच्या मारहाणीला कंटाळली होती नर्स आरोपी नर्सने हत्येची कबुली देताना पोलिसांना सांगितले, दारू पिऊन तिचा पती महेश रोज तिला मारहाण करायचा. २९ नोव्हेंबरलाही दोघांमध्ये भांडण झाले होते. यानंतर महेश झोपी गेल्यावर तिने त्यांचे तोंड उशीने दाबले. महेश मरेपर्यंत तिने उशी दाबून धरली. त्यानंतर ती तिच्या पतीचा मृतदेह त्याच रुग्णालयात घेऊन गेली जिथे ती काम करत होती. याशिवाय तिने या हत्येला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न केला. 

महिलेच्या प्रियकरालाही केली अटककविता ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते, त्या हॉस्पिटलमध्ये विमा विभागात काम करणाऱ्या विनय वर्माशी तिचे संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांच्या व्हॉट्सप चॅटमध्ये महेशच्या हत्येशी संबंधित काही गोष्टी पोलिसांना सापडल्या. याआधारे दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू