शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबला तीन महिन्यांत व्यसनमुक्त करणार, भगवंत मान सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल, अधिकाऱ्यांना दिले असे आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 23:30 IST

Punjab News: मागच्या काही वर्षांपासून वाढती व्यसनाधीनता ही पंजाबमधील गंभीर समस्या बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाबला व्यसनमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

मागच्या काही वर्षांपासून वाढती व्यसनाधीनता ही पंजाबमधील गंभीर समस्या बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाबला व्यसनमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज व्यसनाधीनतेविरोधात लढ्याची घोषणा करताना पोलीस आयुक्त, उपायुक्त, एसएसपी यांना तीन महिन्यांच्या आत पंजाबला व्यसनमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. 

आज याबाबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हा ऐतिहासिक क्षण आहे. कारण राज्य सरकराने व्यसनाधीनतेबाबत नो टॉलरंस धोरण अबलंबण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या समस्येविरोधात व्यापक लढाई सुरू करण्याची तयारी केली आहे.  

भगवंत मान पुढे म्हणाले की, पंजाब पोलिसांचा कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी विविध आव्हानांचा सामना करण्याचा उत्तम इतिहास आहे. पोलीस ही परंपरा कायम राखेल आमि सर्वसामान्यांच्या सक्रीय सहभागाने संपूर्ण राज्याला पूर्णपणे व्यसनमुक्त बनवेल. मुख्यमंत्र्यांनी  सांगितले की, सरकार व्यसनाधीनतेच्या प्रकरणात जलद सुनाणी आणि दोषींनी शिक्षा करण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्टांची स्थापना करणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, या कामासाठी पोलीस आणि प्रशासनला पूर्ण सहकार्य केलं जाईल.  यावेळी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तरुण पिढी व्यसनांच्या विळख्यात सापडू नये म्हणून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्यसनांना आळा घालण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचाही निश्चय केला आहे. त्यांनी व्यसनांचा पुरवठा करणारी साखळी पूर्णपणे तोडण्यासाठी आणि अशा पदार्थांची विक्री करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची घोषणा केली आहे. एवढंच नाही तर अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणारे आणि त्यांच्या कुटुंबीयांना वीज, पाणी आणि इतर सुविधांमध्ये कुठलीही सवलत मिळता कामा नये, यासाठी राज्य सरकार व्यवस्था करणार असल्याचेही भगवंत मान यांनी सांगितले. याबरोबरच अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या विरोधात कारवाईचं उदाहरण घालून देण्यासाठी एनडीपीएस कायद्यामध्ये कुठल्याही आणखी दुरुस्तीची आवश्यकता भासली तर हा मुद्दा केंद्र सरकारसमोर उपस्थित केला जाईल, असेही भगवंत मान यांनी सांगितले.  

टॅग्स :PunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मान