शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यामुळे अलीगढ मुस्लीम विद्यापीठाकडून पदवी परत देण्याचे आदेश, विद्यार्थ्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 21:07 IST

AMU scholar claims his PhD degree was revoked for praising PM Modi : मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यामुळे विद्यापीठाकडून पदवी परत करण्यास सांगितले जात आहे, असा आरोप एका विद्यार्थ्याने केला आहे.

नवी दिल्ली : अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यामुळे विद्यापीठाकडून पदवी परत करण्यास सांगितले जात आहे, असा आरोप एका विद्यार्थ्याने केला आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.

देशातील प्रतिष्ठित अलीगढ मुस्लीम विद्यापीठातून पीएचडी केलेल्या दानिश रहीम याचे म्हणणे की, मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. नरेंद्र मोदींची स्तुती केल्याबद्दल अलीगढ मुस्लीम विद्यापीठ प्रशासनाने त्याला पदवी परत करण्याची नोटीस पाठवली असल्याचा आरोप दानिश रहीम यांनी केला आहे. याप्रकरणी दानिश रहीम याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. 

दानिश रहीम म्हणाला की 'अलीगढ मुस्लीम विद्यापीठाने मला भाषाशास्त्रात मिळालेली पदवी परत करण्यास सांगितले आणि त्याऐवजी जाहिरात आणि विपणन (LAM) मध्ये पदवी घेण्यास सांगितले आहे. मी मोदींची स्तुती केल्यामुळे माझ्यासोबत हे घडत आहे'. तसेच, एका वृत्तवाहिनीशी बोलताना नरेंद्र मोदींची स्तुती केल्याबद्दल भाषाशास्त्र विभागाच्या प्रमुखाने आपल्याला फटकारल्याचा दावा दानिश रहीमने केला. 

याशिवाय, विद्यापीठाच्या संस्कृतीच्या विरोधात असलेली अशी कामे करण्यापासून दूर राहण्यास सांगितले होते, असे रहीम यांनी सांगितले. याचबरोबर, तो पुढे म्हणाला की, "मला माझी पीएचडी पदवी अलीगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. ही प्रतिष्ठित पदवी मिळवण्यासाठी मी 5 वर्षे मेहनत केली आहे. मी माझी पदवी कशी परत करू शकतो? जर अलीगढ मुस्लीम विद्यापीठाने माझी पीएचडी पदवी रद्द केली, तर माझे संपूर्ण करिअर धोक्यात येईल."

आरोप पूर्णपणे निराधार - प्राध्यापक दुसरीकडे, अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे प्राध्यापक शफी किडवे म्हणाले की, हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. विद्यार्थ्याने भाषाशास्त्र विभागाच्या एलएएम कोर्समध्ये एमए आणि पीएचडी केली, जे भाषाशास्त्रात पीएचडी देखील देते. त्याने एलएएममध्ये एमए केले असल्याने त्याला एलएएममध्ये पीएचडी पदवी मिळायला हवी. चुकून विद्यार्थ्याला भाषाशास्त्रात पीएचडीची पदवी देण्यात आली, त्यामुळे पदवी बदलण्यास सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, प्रशासकीय निर्णयावर राजकारणाचा प्रभाव नसतो. चुकून त्याला भाषाशास्त्रात पीएचडीची पदवी देण्यात आली. ही चूक सुधारली जाईल. या घटनेचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. दरम्यान, नोटीस जारी झाल्यापासून 7 दिवसांच्या आत बदलीसाठी दानिश रहीमला 'चुकीची पदवी' परत करण्यास अलीगढ मुस्लीम विद्यापीठाने सांगितले होते.  

टॅग्स :universityविद्यापीठNarendra Modiनरेंद्र मोदी