"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 09:00 IST2025-10-28T08:58:44+5:302025-10-28T09:00:09+5:30
महिलेने पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं. दार उघडताच पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून पत्नी प्रचंड चिडली आणि थेट चप्पल काढून दोघांना धू-धू धुतलं.

फोटो - nbt
उत्तर प्रदेशातील अमरोह जिल्ह्यातील डिडौली महामार्गावरील एका गेस्ट हाऊसमध्ये एका महिलेने तिच्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं. दार उघडताच पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून पत्नी प्रचंड चिडली आणि थेट चप्पल काढून दोघांना धू-धू धुतलं. "मी तुला कच्च खाऊन टाकेन" म्हणत संतापलेल्या पत्नीने पतीसह त्याच्या गर्लफ्रेंडला मारहाण केली.
गेस्ट हाऊसमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गेस्ट हाऊसमध्ये या घटनेमुळे जवळपास अर्धा तास एक हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी आले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पण ते घटनास्थळी आले नाहीत. याच दरम्यान पती हॉटेलमधून पळून गेला. मारहाणीचा व्हिडीओ रात्री सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
पत्नीला राग अनावर
पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहून पत्नीला राग अनावर झाला. या घटनेमुळे गेस्ट हाऊसमध्ये गोंधळ निर्माण झाला. लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु महिला बराच वेळ पतीला मारत होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.