'तो' बॉम्ब ठेवण्यासाठी आला, पण हातातच स्फोट झाला; दहशतवादी कृत्य की अन्य काही? अमृतसरमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:55 IST2025-05-27T11:29:53+5:302025-05-27T11:55:49+5:30

पंजाबच्या अमृतसर बायपासवर हा स्फोट झाला आहे. जो व्यक्ती स्फोट घडविण्यासाठी बॉम्ब ठेवायला जात होता, त्याच्या हातातच हा बॉम्ब फुटल्याचे सुत्रांनी सांगितले.

Amritsar Bomb Blast: explodes in the hand of the person who came to place it; Terrorist act or something else? Excitement in Amritsar | 'तो' बॉम्ब ठेवण्यासाठी आला, पण हातातच स्फोट झाला; दहशतवादी कृत्य की अन्य काही? अमृतसरमध्ये खळबळ

'तो' बॉम्ब ठेवण्यासाठी आला, पण हातातच स्फोट झाला; दहशतवादी कृत्य की अन्य काही? अमृतसरमध्ये खळबळ

दोन आठवड्यांपूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये हवाई युद्ध सुरु झाले होते. भारताचे हल्ले काही केल्या पाकिस्तानला थोपविता आले नाहीत. परंतू, भारताने पाकिस्तानचे सर्व हवाई हल्ले हवेतच थोपविले होते. हे संपत नाही तोच आता अमृतसरमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न फसला आहे. बॉम्ब ठेवण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातच हा बॉम्ब फुटला आहे. 

पंजाबच्या अमृतसर बायपासवर हा स्फोट झाला आहे. जो व्यक्ती स्फोट घडविण्यासाठी बॉम्ब ठेवायला जात होता, त्याच्या हातातच हा बॉम्ब फुटल्याचे सुत्रांनी सांगितले. या स्फोटात हा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

अमृतसर ग्रामीण पोलीस याबाबत माहिती देणार आहेत. घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे. २७ मे रोजी सकाळी ९.३० वाजता मजिठा रोड बायपासजवळ हा स्फोट झाला. या स्फोटात ठेवणाऱ्याचे दोन्ही हात निकामी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: Amritsar Bomb Blast: explodes in the hand of the person who came to place it; Terrorist act or something else? Excitement in Amritsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.