शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

अमृतसरच्या दुर्घटनेत रेल्वे व ड्रायव्हरचा दोष नाही, रेल्वे राज्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 6:54 AM

साठहून अधिक लोक ज्या रेल्वेखाली चिरडून ठार झाले, त्या प्रकरणात रेल्वेचा दोष नसल्याने, गाडीच्या ड्रायव्हरविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

अमृतसर : साठहून अधिक लोक ज्या रेल्वेखाली चिरडून ठार झाले, त्या प्रकरणात रेल्वेचा दोष नसल्याने, गाडीच्या ड्रायव्हरविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६१ झाली आहे. मृतांपैकी ९ जणांची ओळख पटणे शिल्लक आहे. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयलही अमेरिका दौरा सोडून परत आले.मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज जखमींची विचारपूस केली व या दुर्घटनेची दंडाधिकारीय चौकशी जाहीर केली. रेल्वेही गँगमनने ड्रायव्हरला लाल बावटा का दाखवला नाही, याची चौकशी करणार आहे. मंत्री नवज्योत सिद्धू यांनीही रुग्णालय व अपघातस्थळी भेट दिली. सिद्धू यांच्या पत्नी कार्यक्रमास हजर होत्या. मात्र त्या लवकर निघून गेल्या. त्यांनी सांगितले की, दहनाच्या वेळी रेल्वेमार्गावर उभे राहू नका, असे आयोजक वारंवार ध्वनिक्षेपकावरून सांगत होते. तसेच रेल्वेचा गेटमनही तेथे उपस्थित होता. त्याने लाल बावटा दाखवायला हवा होता. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा म्हणाले की, ही दुर्घटना होण्यात रेल्वेचा दोष नाही. त्यामुळे ड्रायव्हरवर कारवाई करण्यात येणार नाही.रेल्वे अधिकाऱ्यांनीही याचे खापर प्रशासनावरच फोडले. त्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वेमार्ग ही उत्सवाची जागा नाही. रावणदहनासाठी येथे गर्दी करणे ही रेल्वेच्या हद्दीत घुसखोरी आहे. एवढी गर्दी जमेल, याची प्रशासनाने कल्पना दिलेली नव्हती.अपघाताची माहिती ड्रायव्हरने अमृतसर रेल्वे स्टेशनात जाऊन दिली. रेल्वे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांनुसार ड्रायव्हरचे म्हणणे असे की, रेल्वे फाटक बंद होते व गाडीला हिरवा सिग्नल होता. त्यामुळे गाडी थांबवण्याचे पूर्वसंकेत नव्हते. लोक जमले होते त्याआधी वळण असल्याने नियमानुसार भोंगेही वाजविले. पण तेथे प्रचंड धूर असल्याने पुढचे दिसत नव्हते. त्यामुळे गाडी जमावात शिरल्यावरच विपरीत घडल्याचे लक्षात आले.रुग्णालयांतील जखमींनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना सांगितले की, रावणदहनाच्या वेळी फटाक्यांचा आवाज प्रचंड होता. त्यामुळे गाडीचा हॉर्न आम्हाला ऐकूच आला नाही.>रावणही पडला मृत्युमुखीही दुर्घटना घडली त्या भागात शेकडो लहान-मोठे उद्योग आहेत. त्यात बिहारव उत्तर प्रदेशमधीलकामगार काम करतात. रेल्वेमार्गालगतच्या मैदानावर त्यांचीच रामलीला असते. रामलीलेमध्ये रावणाचे पात्र रंगविले तो दलबीर सिंगही अपघातात मृत्यू पावला. रामलीला संपल्यावर तोही रावणदहन पाहण्यासाठी उभा होता. मात्र त्याने सात ते आठ जणांना वाचवले.

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटना