शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

खराब कामगिरी असलेल्यांत रालोआचे सात मुख्यमंत्री, राज्यात उद्धव ठाकरे यांची कामगिरी पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा सरस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 2:21 AM

देशातील पहिल्या दहा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये बिगरभाजप सात मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या कामगिरीचा व लोकप्रियतेचा आढावा घेण्यासाठी आयएएनएस सी-व्होटर स्टेट ऑफ दी नेशन-२०२१ हे सर्वेक्षण करण्यात आले. 

नवी दिल्ली : देशातील खराब कामगिरी असलेल्या पहिल्या दहा मुख्यमंत्र्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सात मुख्यमंत्री असून त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आदींचा समावेश आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देशातील सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री, तर उत्तराखंडचे भाजपचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत हे सर्वांत अप्रिय मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा सरस ठरली आहे.देशातील पहिल्या दहा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये बिगरभाजप सात मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या कामगिरीचा व लोकप्रियतेचा आढावा घेण्यासाठी आयएएनएस सी-व्होटर स्टेट ऑफ दी नेशन-२०२१ हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील निष्कर्षात म्हटले आहे की, नजीकच्या काळात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आसाम, केरळ, पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्र्यांनी उत्तम काम केले असून त्याचे प्रमाण यासंदर्भातील राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. तामिळनाडू, पुडुचेरी येथील मुख्यमंत्र्यांची कामगिरी सुमार असून सत्ताधीशांविरोधी जनमताचा फटका या सरकारांना निवडणुकांमध्ये बसू शकतो.नवीन पटनायक यांच्यानंतर देशात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांचा क्रमांक लागतो. सर्वात अप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचाही समावेश आहे. महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी मात्र त्यांच्या राज्यात पंतप्रधानांपेक्षाही सरस ठरली आहे. आंध्र प्रदेश, केरळ, दिल्ली, ओदिशा, पश्चिम बंगाल या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता मोदी यांच्यापेक्षाही जास्त आहे. पंजाबमध्ये मोदी सर्वांत अप्रिय नेते -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कारकीर्दीतही त्यांची लोकप्रियता अनेक राज्यांत टिकून आहे. ४४.५५ टक्के लोकांचे मोदींविषयी चांगले मत आहे. सर्व राज्यांपैकी ओदिशामध्ये मोदी सर्वांत जास्त लोकप्रिय आहेत. त्यानंतर गोवा, तेलंगणाचा क्रमांक लागतो. मात्र पंजाबमध्ये मोदी सर्वांत अप्रिय नेते आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPunjabपंजाब