अमित शहांचं विमान अचानक गुवाहटीत उतरलं, रात्रीचा मुक्कामही तिथेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 10:40 IST2023-01-05T10:38:51+5:302023-01-05T10:40:35+5:30
खराब हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे अमित शहा यांना अगरतलाच्या महाराजा वीर विक्रम विमानतळावर उतरवण्यात आले

अमित शहांचं विमान अचानक गुवाहटीत उतरलं, रात्रीचा मुक्कामही तिथेच
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विमानाचे अचानक गुवाहटीत लँडींग करण्यात आले. बुधवारी रात्री खराब हवामानामुळे शहा यांचे विमान गुवाहटीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झाले. अमित शहा यांना अगरतला येथे जायचं होतं, पण मोठ्या प्रमाणात धुके असल्याने त्यांचे विमान अगरतला येथे जाऊ शकले नाही. त्यामुळे, विमानाला जवळच असलेल्या गुवाहटी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले. तेथे त्यांना सुरक्षितपणे बाहेर उतरवण्यात आले.
खराब हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे अमित शहा यांना अगरतलाच्या महाराजा वीर विक्रम विमानतळावर उतरवण्यात आले. शहा यांना बुधवारी रात्री अगरतला पोहोचायचे होते, त्यानंतर आज गुरुवारी पूर्वोत्तर राज्यातील दोन रथयात्रांना हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करायची होती. पश्चिम त्रिपुराचे पोलीस अधीक्षक शंकर देबनाथ यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले की, गृहमंत्री अमित शहांना बुधवारी रात्री १० वाजता एमबीबी विमानतळावर उतरायचे होते. पण, खराब हवामानामुळे त्यांचे विमान गुवाहटीत उतरले आणि ते गुवाहटीत मुक्कामाला राहिले.
दरम्यान, अमित शहा हे उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील धर्मनगर आणि दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील सबरुम येथेून रथयात्रेचा शुभारंभ करणार आहेत. त्यासाठी, ते सकाळीच अगरतला येथे पोहोचणार आहेत. तसेच, येथे जनविश्वास यात्रेचंही आयोजन करण्यात आलं असून गृहमंत्री शहा यांच्याहस्तेच या यात्रेचा शुभारंभ होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री राजीव भट्टाचार्य यांनी दिली.