शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहंनी 188 पाकिस्तानी हिंदूंना दिले भारतीय नागरिकत्व, विरोधकांवर साधला निशाणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 14:43 IST

Amit Shah Attack Congress on CAA: विरोधक CAA बाबत देशातील मुस्लिमांना भडकावत आहे.

Amit Shah on CAA : देशात नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर अनेकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. आता रविवारी (18 ऑगस्ट 2024) देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी CAA अंतर्गत 188 पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व दिले. अहमदाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी भारताच्या शेजारील देशातील हिंदूंच्या परिस्थितीवरही भाष्य केले.

'विरोधक दिशाभूल करत आहेत...'यावेळी अमित शाह म्हणतात, "बांग्लादेशात फाळणी झाली, तेव्हा तिथे 27 टक्के हिंदू होते, आज 9 टक्के शिल्लक आहेत. हिंदू गेले कुठे? आम्ही 2019 मध्ये CAA आणला, ज्यामुळे करोडो हिंदू, जैन आणि शीख धर्माच्या लोकांना नागरिकत्व मिळाले. इंडिया आघाडी CAA बाबत मुस्लिमांना भडकावण्याचे काम करत आहे. CAA कायदा कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही. काही राज्य सरकारे CAA बद्दल लोकांची दिशाभूल करत आहेत."

'काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे..'"काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे स्वातंत्र्यानंतर शेजारील देशांतून आलेल्या हिंदू, बौद्ध आणि शीखांना न्याय मिळाला नाही. आश्वासन देऊनही या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळाले नाही. अशा करोडो लोकांना नरेंद्र मोदींनी न्याय दिला. मी माझ्या सर्व निर्वासित बांधवांना सांगतो की, तुम्ही नागरिकत्वासाठी कोणताही संकोच न करता अर्ज करा. तुमचे काहीही चुकीचे होणार नाही. यामध्ये कोणत्याही फौजदारी खटल्याची तरतूद नाही, तुमचे घर, तुमची नोकरी, सर्व काही अबाधित राहील. विरोधक तुमची दिशाभूल करत आहेत," असेही शाह यावेळी म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPakistanपाकिस्तान