शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचा चीनला झटका, 90 दिवसांच्या आत टिकटॉकची संपत्ती विकण्याचा बाइटडान्सला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 11:57 IST

गेल्या आठवड्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वुईचॅटच्या चिनी मालकांसोबत डिलिंग करण्यावर बंदी घातली होती.

ठळक मुद्देबाइटडान्सने, असे पाऊल उचलले, ज्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहेगेल्या आठवड्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वुईचॅटच्या चिनी मालकांसोबत डिलिंग करण्यावर बंदी घातली होती.अमेरिकेतील टिकटॉचा व्यवसाय विकत घेण्यासंदर्भात मायक्रोसॉफ्टची बाइटडान्ससोबत चर्चा सुरू आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चिनी कंपनी बाइटडान्सला टिकटॉक अॅपचा अमेरिकेतील संपूर्ण बिझनेस विकण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे यासाठी अेरिकेने बाइटडान्सला 90 दिवसांची मुदतही दिली आहे. ट्रम्प यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे, की बाइटडान्सने, असे पाऊल उचलले, ज्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. याचे विश्वासार्ह पुरावेही आहेत. 

गेल्या आठवड्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वुईचॅटच्या चिनी मालकांसोबत डिलिंग करण्यावर बंदी घातली होती. ते म्हणाले होते, की ट‍िकटॉक आणि वुईचॅट अमेरिकेची राष्‍ट्रीय सुरक्षितता, परराष्ट्र नीती आणि अर्थव्‍यवस्‍थेसाठी धोका आहे. टिकटॉकसंदर्भात देण्यात आलेल्या या आदेशाचा अर्थ नेमका काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेत 10 कोटी युझर्स हे अॅप वापरतात.

मायक्रोसॉफ्टची बाइटडान्ससोबत चर्चा सुरू -ट्रम्प यांनी बाइटडान्सला अमेरिकन यूझर्सकडून घेण्यात आलेल्या अथवा कुठल्याही प्रकारचा डाटा परत देण्यासही सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील टिकटॉचा व्यवसाय विकत घेण्यासंदर्भात मायक्रोसॉफ्टची बाइटडान्ससोबत चर्चा सुरू आहे. एवढेच नाही, तर मायक्रोसॉफ्ट अथवा इतर कुठलीही कंपनी टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय विकत घेऊ शकली नाही तर देशात टिकटॉक बॅन करण्यासाठी 15 सप्टेंबर ही तारीख डोनाल्‍ड ट्रम्प यांनी निश्चित केली आहे. त्यांनी यासदर्भातील कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी केली आहे.

ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच चिनी अॅप टिकटॉक आणि वुईचॅट 45 दिवसांच्या आत बंद करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. 

चिनी कम्‍युनिस्‍ट पार्टीवर निशाणा - डोनाल्‍ड ट्रम्प यांनी म्हटले आहे, की 'डेटा कलेक्‍शनमुळे चिनी कम्‍युनिस्‍ट पार्टी अमेरिकन लोकांच्या खासगी माहितीपर्यंत पोहोचते. यामुळे चीन अमेरिकन कर्मचारी आणि ठेकेदारांची ठिकाणं ट्रॅक करू शकतो. एवढेच नाही, तर कम्‍युनिस्‍ट पार्टी खासगी माहितीचा ब्लॅकमेलिंगसाठी आणि कॉर्पोरेट हेरगीरीसाठीही वापर करू शकतो,' असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाchinaचीनTik Tok Appटिक-टॉक