Rahul Gandhi News:इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धात आखातात अनेक आघाड्यांवर पसरलेले दिसून आले. इराणचे समर्थन असलेल्या हिजबोल्लाह व अन्य बंडखोर गटांनी इस्रायल, अरब राष्ट्रांतील अमेरिकेचे सैन्यतळावर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायल व अमेरिकेने इराणवर भीषण तुफान बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. या संघर्षामुळे हजारो प्रवासी विविध देशांत अडकले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या आणि कोणत्याही 'एक्झिट प्लॅन'चा अभाव यामुळे हा संघर्ष लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. यातच काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत पंतप्रधानांना थेट प्रश्न विचारला आहे.
राहुल गांधी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतात की, अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील शत्रूत्वाची भावना वाढत चालली असून, यामुळे सदर संवेदनशील प्रदेश व्यापक संघर्षाकडे ढकलला जात आहे. जवळजवळ एक कोटी भारतीयांसह कोट्यवधी लोक अनिश्चिततेचा सामना करत आहेत. इराणवरील एकतर्फी हल्ले तसेच इराणने मध्य पूर्वेतील इतर देशांवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला पाहिजे. संवाद आणि संयम हा शांततेचा एकमेव मार्ग आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
मौन बाळगल्याने जगात भारताची प्रतिमा मलीन होत आहे
भारताने नैतिकदृष्ट्या स्पष्ट असले पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवी जीवनाच्या रक्षणासाठी बोलण्याचे धाडस आपल्याकडे असले पाहिजे. पंतप्रधान मोदींनी बोलले पाहिजे. जागतिक व्यवस्थेची व्याख्या करण्यासाठी ते राष्ट्रप्रमुखाच्या हत्येचे समर्थन करतात का? आता मौन बाळगल्याने जगात भारताची प्रतिमा मलीन होत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, भारताचे परराष्ट्र धोरण ऐतिहासिकदृष्ट्या सार्वभौम समानता, हस्तक्षेप न करणे आणि शांततापूर्ण तोडगा यासारख्या तत्त्वांवर आधारित आहे. सध्याचे मौन या तत्वांशी विसंगत दिसते. हे मौन तटस्थता नाही तर जबाबदारीचा त्याग आहे. यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाची दिशा आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.
Web Summary : Rahul Gandhi questions PM Modi's silence on rising US-Israel-Iran tensions. He urges condemnation of attacks and emphasizes dialogue for peace, criticizing the impact of silence on India's global image. Sonia Gandhi echoes concerns about India's foreign policy alignment.
Web Summary : राहुल गांधी ने अमेरिका-इजरायल-ईरान तनाव पर पीएम मोदी की चुप्पी पर सवाल उठाया। उन्होंने हमलों की निंदा करने और शांति के लिए संवाद पर जोर दिया, भारत की वैश्विक छवि पर चुप्पी के प्रभाव की आलोचना की। सोनिया गांधी ने भारत की विदेश नीति पर चिंता व्यक्त की।