शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

अ‍ॅम्ब्युलन्स नाकारली; गर्भवतीला नेले दुचाकीवरून, झारखंडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 04:45 IST

बेशुद्धावस्थेतील गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यास रुग्णवाहिका नाकारण्यात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला मोटारसायकलवर बसवून आरोग्य केंद्रात नेले.

रांची : खूप रक्तस्राव होत असलेल्या व बेशुद्धावस्थेतील गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यास रुग्णवाहिका नाकारण्यात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला मोटारसायकलवर बसवून आरोग्य केंद्रात नेले. तिथून मात्र तिला अ‍ॅम्ब्युलन्सने एका रुग्णालयात नेऊन तपासणी करण्यात आली व लगेचच दुसऱ्या रुग्णालयात हलविले. झारखंडमधील या महिला रुग्णाचे अशा पद्धतीने हाल झाल्याने संताप व्यक्त होत आहे.शांतीदेवी (३० वर्षे) या गर्भवती महिलेची प्रकृती खूपच बिघडल्याने तिला चांडवा आरोग्य केंद्रात नेण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स मिळू शकली नाही. त्यामुळे तिच्या घरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या चांडवा आरोग्य केंद्रामध्ये तिला मोटरसायकलवरून नेण्यातआले.तेथील डॉक्टरांनी या महिलेला लातेहार रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. आरोग्य केंद्रापासून हे रुग्णालय २७ किमी इतक्या अंतरावर आहे.तेथे तिला नेण्यासाठी सुदैवाने अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली. तिथे तपासणी झाल्यावर पुन्हा शांतीदेवीला रांचीमधील राजेंद्र इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या रुग्णालयात दाखल करण्यास डॉक्टरांनीसांगितले.गंभीर अवस्थेतील या महिला रुग्णाची त्रिस्थळी यात्रा अखेर या रुग्णालयात पोहोचून तिला तिथे दाखल करून घेण्यात आले.प्रकृती बिघडलेल्या शांतीदेवीला उत्तम उपचारांच्या नावाखाली आरोग्य केंद्र व रुग्णालयांतील डॉक्टरांनी जी धावपळ करायला लावली ती धक्कादायक होती. रुग्णांना मदत करण्याचे काम करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांनीही या घटनेत डॉक्टरांनाच साथ दिली.शांतीदेवीचा पती कमल गंजू यांनी सांगितले की, आम्ही अ‍ॅम्ब्युलन्स मागविली होती. १०८ क्रमांकावर दूरध्वनीही केला होता. मात्र, तिथून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शांतीदेवीला मोटारसायकलवरून आरोग्य केंद्रात आणण्याशिवाय आमच्यासमोर पर्यायही नव्हता. (वृत्तसंस्था)जिवाशी केला खेळमाकपचे नेते व सामाजिक कार्यकर्ते अयूब खान यांनी सांगितले की, आरोग्य केंद्रात रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका नाकारणे, तिला रक्त देण्यास लातेहार सदर रुग्णालयाने नकार देणे ही गंभीर बाब आहे.तेथील डॉक्टरांनी शांतीदेवीच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :JharkhandझारखंडHealthआरोग्य