शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

मुकेश अंबानींना तगडा भिडू मिळणार; 'जगज्जेता' 20 अब्ज डॉलर गुंतवण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 14:56 IST

रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर सलग चौथ्या दिवशी वाढले असून आतापर्यंतच्या उच्चस्तरावर पोहोचले आहेत. अमेरिकी कंपनी सिल्व्हर लेक पार्टनर्सने रिलायन्समध्ये 7500 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकी इक्विटी फर्म केकेआर आणि फेसबुकने रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे.

मुकेश अंबानी यांच्यासाठी कोरोना काळातील मंदी भली मोठी संधी घेऊन आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून अंबानींच्या रिलायन्स ग्रुपला फेसबुक, गुगल सारखे मोठमोठे गुंतवणूकदार मिळाले आहे. आता तर अंबानींना यापेक्षाही तगडा भिडू मिळणार आहे. दुसरा तिसरा कोणी नसून ईकॉमर्स क्षेत्रात जगावर राज्य करत असलेली अ‍ॅमेझॉन (Amazon) कंपनी आहे. 

रिलायन्स ग्रुपच्या रिटेल व्यवसायामध्ये Amazon 20 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. भारतीय चलनात ही किंमत 1.5 लाख कोटी रुपये एवढी होते. याचाच अर्थ रिलायन्स रिटेल व्य़वसायातील 40 टक्के वाटा अ‍ॅमेझॉनला विकणार आहे. याबाबतची माहिती या व्यवहाराशी संबंधित सूत्राने दिली आहे. 

Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार

WhatsApp वरील समाजकंटकांपासून कसे वाचाल? जाणून घ्या टिप्स अन् रहा सुरक्षित

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) सोबत सुरु असलेली ही डील यशस्वी झाली तर भारतालाच रिटेलमधील महारथी मिळणार नाही तर जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या जेफ बेजोस आणि आशियातील सर्वात श्रीमंत अंबानी यांच्यामधील व्यावसायिक संबंधांमुळे जागतिक बाजाराचा रस्ता खुला होणार आहे. ही अ‍ॅमेझॉनसाठी भारतातील सर्वात मोठी डील असणार आहे. 

वाहता झरारिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर सलग चौथ्या दिवशी वाढले असून आतापर्यंतच्या उच्चस्तरावर पोहोचले आहेत. अमेरिकी कंपनी सिल्व्हर लेक पार्टनर्सने रिलायन्समध्ये 7500 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. यामुळे रिलायन्सचे बाजारमुल्य वाढून 14.07 लाख कोटींवर गेले आहे. याआधी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केल्यानंतर सिल्व्हर लेक पार्टनर्सने रिटेलमध्ये पैसा लावला आहे. ही जगातील सर्वात मोठी टेक इन्व्हेस्टर कंपनी आहे. या गुंतवणुकीमुळे कंपनीला रिलायन्समध्ये 1.75 टक्के हिस्सेदारी मिळणार आहे. अमेरिकी इक्विटी फर्म केकेआर आणि फेसबुकने रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. फ्यूचर ग्रुपसोबत रिलायन्सचा सौदा पक्का झाला की या कंपन्या रिलायन्समध्ये गुंतवणूक करणार आहेत. 

फ्युचर ग्रुप ताब्यातरिलायन्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रामध्ये मोठा विस्तार करू लागली असून ऑनलाईन फार्मसी कंपनी नेटमेड्स खिशात घातल्यानंतर आता रिटेल क्षेत्रातील फ्युचर ग्रुपची सर्वात मोठी कंपनी बिग बझार, फूड बझारवरही 'कब्जा' केला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने  फ्युचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल बिझनेस तसेच लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग बिझनेस खरेदी केला आहे. हा व्यवहार लवकरच पूर्णत्वास येणार असून 24713 कोटी रुपयांना ही डील झाली आहे. यामुळे बिग बझार, फूड बझार, ई-झोन आणि अन्य रिटेल व्यवसाय रिलायन्सच्या ताब्यात आले आहेत. या डीलमुळे रिलायन्स रिटेल क्षेत्रातील बेताज बादशाह बनली आहे. हा व्यवहार झाल्यावर फ्यूचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाईफस्टाईल लिमिटेड (RRFLL) अंतर्गत येणार आहे. RRFLL  ही RRVLच्या पूर्ण मालकीची कंपनी आहे. 

रिलायन्स बिग बझार ताब्यात घेतल्यानंतर फ्युचर ग्रुप एंटरप्रायझेसमध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स 1200 कोटी रुपये गुंतवणार आहे. तसेच 6.09 टक्के हिस्साही खरेदी करणार आहे. याशिव्या 400 कोटी रुपये इक्विटी वॉरंटच्या रुपात गुंतविणार आहे. यामुळे एकूण 7.05 टक्के हिस्सा हा रिलायन्सकडे राहणार आहे. 

Netmeds ची खरेदीरिलायन्स इंडस्ट्रीची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने ऑनलाईन फार्मसी नेटमेड्समध्ये (Netmeds) 60 टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. रिलायन्सने ही डील 620 कोटींमध्ये केली असून मंगळवारी याची घोषणा केली. RRVL ने ही हिस्सेदारी व्हिटेलिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडमध्ये खरेदी केली आहे. या कंपनीच्या सहाय्यक कंपन्यांना नेटमेड्स नावाने ओळखले जाते. रिलायन्सने अन्य कंपन्या त्रिसारा हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, नेटमेड्स मार्केटप्लेस लिमिटेड आणि दाधा फार्मा डिस्ट्रिब्यूशन प्राइवेट लिमिटेडमध्ये 100 टक्के मालकी खरेदी केली आहे. 

 

जग हादरले! युद्धखोर चीनने मिसाईल डागली; हिमालयाच्या नजिकचे लोकेशन

टॅग्स :Relianceरिलायन्सamazonअ‍ॅमेझॉनBig Bazaarबिग बाजारFacebookफेसबुक