अजब प्रेमात गजब क्लायमॅक्स: लहान बहिणीचे पतीशी संबंध, मोठीचा गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 06:13 IST2023-08-11T06:13:10+5:302023-08-11T06:13:22+5:30

ईशान्य दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला

Amazing Climax in Ajab Prem: Younger sister's relationship with her husband, elder's firing | अजब प्रेमात गजब क्लायमॅक्स: लहान बहिणीचे पतीशी संबंध, मोठीचा गोळीबार

अजब प्रेमात गजब क्लायमॅक्स: लहान बहिणीचे पतीशी संबंध, मोठीचा गोळीबार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : एका महिलेने तिच्या पतीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून लहान बहिणीवर गोळी झाडली. ईशान्य दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. सुमैला (वय २०) असे जखमी बहिणीचे नाव असून, ती बुलंद मशिद भागातील रहिवासी आहे. 

मोठी बहीण सोनूने (वय ३०) गावठी कट्ट्यातून गोळी झाडून मला ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे सुमैला हिने पोलिसांना सांगितले. सुमैलाच्या चेहऱ्यावर गोळीचा छर्रा लागल्यानंतर सोनूने कट्ट्याच्या बटने तिच्या डोक्यावर  अनेक प्रहारही केले. या घटनेत पीडितेला किरकोळ दुखापत झाल्याचे पाेलिस उपायुक्त जॉय टिर्की यांनी सांगितले. 

धाकटी बहीण सुमैलाचे आपल्या पतीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय सोनूला होता. त्यातून हा प्रकार घडला. या प्रकरणी येथील शास्त्री पार्क पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) व शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सोनूला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Amazing Climax in Ajab Prem: Younger sister's relationship with her husband, elder's firing