VIDEO: ...अन् हवेत गोल-गोल फिरलं भाजपा खासदाराचं हेलिकॉप्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 14:47 IST2019-06-30T14:47:06+5:302019-06-30T14:47:30+5:30

 उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला

Alwar BJP MP Mahant Balaknaths chopper loses control | VIDEO: ...अन् हवेत गोल-गोल फिरलं भाजपा खासदाराचं हेलिकॉप्टर

VIDEO: ...अन् हवेत गोल-गोल फिरलं भाजपा खासदाराचं हेलिकॉप्टर

अलवर: राजस्थानच्या अलवरमध्ये आज एक मोठी दुर्घटना टळली. भाजपाचे खासदार महंत बालकनाथ यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यावर वाऱ्याच्या वेगामुळे ते गोल-गोल फिरू लागलं. मात्र पायलटनं समयसूचकता दाखवत परिस्थिती हाताळली. त्यानं योग्य वेळी हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होण्यापासून बचावलं. मात्र हे पाहताना उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.  

भाजपाचे खासदार बालकनाथ त्यांच्या मतदारसंघातील कोट कासिम भागातील मंदिरात गेले होते. यानंतर ते हेलिकॉप्टरनं निघाले. मात्र हवेत काही फूट जाताच वाऱ्याच्या वेगामुळे त्यांचं हेलिकॉप्टर गोल-गोल फिरू लागलं. जमिनीपासून काही फूटांवर हेलिकॉप्टर अतिशय वेगात फिरत होतं. बालकनाथ यांचे कार्यकर्ते श्वास रोखून हा प्रकार पाहत होते. मात्र पायलटनं प्रसंगावधान राखत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. 




जमिनीपासून काही फूट अंतरावर खासदार बालकनाथ यांचं विमान गोल-गोल फिरत होतं. वाऱ्याचा वेग पाहता दुर्घटना घडण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे कार्यकर्ते श्वास रोखून हेलिकॉप्टरकडे पाहू लागले. आतापर्यंत अनेक नेत्यांनी विमान अपघातात जीव गमावला असल्यानं उपस्थित कार्यकर्त्यांना काळजी वाटू लागली. मात्र हेलिकॉप्टरच्या पायलटनं समयसूचकता दाखवल्यानं मोठा अनर्थ टळला. 

Web Title: Alwar BJP MP Mahant Balaknaths chopper loses control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.