'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:18 IST2025-07-14T12:16:23+5:302025-07-14T12:18:42+5:30

Air India : अहमदाबाद विमान अपघाता प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे, या अहवालानंतर पायलट युनियनने नाराजी व्यक्त केली आहे.

Allegation of pilot's suicide is baseless Pilots union demands inclusion in plane crash investigation team | 'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी

'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी

अहमदाबाद विमान अपघाताबाबत एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) चा प्राथमिक अहवाल सतत चर्चेत आहे. या अहवालात विमान अपघातामागील फ्यूज कटऑफ हे कारण असल्याचे व्यक्त करण्यात आले आहे, ज्यामुळे पायलट युनियन संतापली आहे. एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया (ALPA-इंडिया) ने विमान अपघाताच्या चौकशीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. अपघाताबाबत एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा प्राथमिक अहवाल चर्चेत आला आहे. 

Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग

या अहवालात विमान अपघातामागील फ्यूज कटऑफ हे कारण असल्याचे व्यक्त करण्यात आले आहे, यामुळे पायलट युनियन संतापली आहे. एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने विमान अपघाताच्या चौकशीत समावेश करण्याची मागणी केली आहे.

इंडियन कमर्शियल पायलट्स असोसिएशनने पायलटने विमानाचे इंधन कट केल्याच्या सिद्धांताचा निषेध केला आहे. ICPA चे म्हणणे आहे की, तपास पूर्ण न करता अशा प्रकारे पायलटला दोष देणे योग्य नाही. पायलटने आत्महत्येचा हा आरोप पूर्णपणे निराधार आहे.

आयसीपीएने निषेध केला

आयसीपीएच्या मते, अपघातानंतर माध्यमांमध्ये आणि नागरिकांमध्ये ज्या प्रकारची चर्चा सुरू आहे त्यामुळे आम्हाला दुःख झाले आहे. पायलटने आत्महत्येचा हा आरोप मूर्खपणाचा आणि निराधार आहे. अशा दाव्यांना कोणताही आधार नाही. प्राथमिक तपास आणि अपूर्ण डेटाच्या आधारे असे आरोप करणे हे केवळ एक बेजबाबदार कृत्यच नाही तर त्यांच्या कुटुंबाप्रती असंवेदनशीलता देखील दर्शवते, असंही त्यांनी म्हटले आहे.

एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने विमान अपघाताच्या चौकशीत समावेश करण्याची मागणी केली आहे. ALPA-इंडिया 800 एअरलाइन्स आणि हेलिकॉप्टर कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते. ही संघटना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एअरलाइन पायलट्स असोसिएशनशी देखील संबंधित आहे. तसेच जगातील 100 देशांमधील 1 लाख पायलट IFALPA चे सदस्य आहेत.

एएआयबीचा प्राथमिक अहवाल वेबसाइटवर टाकण्यात आला होता. त्यावर कोणीही स्वाक्षरी केलेली नव्हती. आम्हाला पारदर्शकता हवी आहे. आमच्या प्रतिनिधीला तपास पथकात समावेश करायचे आहे," असे एएलपीए-इंडियाचे अध्यक्ष सॅम थॉमस यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

Web Title: Allegation of pilot's suicide is baseless Pilots union demands inclusion in plane crash investigation team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.