धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 10:41 IST2018-09-07T09:30:17+5:302018-09-07T10:41:20+5:30

एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Allahabad : Four members of a family have been allegedly killed in Bigahiya | धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या

धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या

लखनौ - अलाहाबादमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. सोरांव परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. प्रताप सिंह, त्यांची पत्नी किरण, सात वर्षांचा मुलगा विराट आणि किरण यांच्या आई कमलेश देवी, या चारही जणांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, हत्याकांडामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मारेकऱ्यांनी सिंह दाम्पत्याच्या एक वर्षाच्या मुलीला जिवंत सोडले आहे. महिन्याभरापूर्वीच किरण यांनी मुलीला जन्म दिला होता. प्रताप सिंह यांच्या शेजाऱ्यांना या चिमुकलीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. मुलगी का रडत आहे, याची विचारपूस करण्यासाठी शेजाऱ्यांनी अनेक वेळा प्रताप सिंह यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शेवटी त्यांनी आपल्या मुलाला प्रताप सिंह यांच्या घरी पाठवले. 

त्यांच्या घरी दाखल होताच मुलाला धक्काच बसला. कारण लहान मुलीव्यतिरिक्त सर्व जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तातडीनं घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रताप सिंह यांचे कोणासोबतही वाद नव्हते. मग सिंह कुटुंबीयांची हत्या का करण्यात आली, याचा शोध पोलीस घेत आहेत. 




 

Web Title: Allahabad : Four members of a family have been allegedly killed in Bigahiya