शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’मध्ये सर्व विराेधी पक्षही उतरणार, देशभरातील ४०० संघटना सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 07:05 IST

Farmers' 'Bharat Bandh : मंगळवारी, ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदमध्ये शेतकरी संघर्ष समन्वय समितीत देशभरातील ४०० शेतकरी संघटनांचा सहभाग आहे.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात अखिल भारतीयशेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी, ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदमध्ये काँग्रेससोबतच तृणमूल , राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय लोक दल, राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसपा), समाजवादी पक्ष तसेच डावे पक्ष आदी विरोधी पक्ष सामील होणार आहेत. शेतकरी संघर्ष समन्वय समितीत देशभरातील ४०० शेतकरी संघटनांचा सहभाग आहे. बंदमध्ये माकप, भाकप, सीपीआय (एमएल), रेव्होल्युशनरी सोशॅलिस्ट पार्टी (आरएसपी), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आदी पक्षही सहभागी होणार आहेत.पाठिंबा देणारी राज्ये व सत्ताधारी पक्षमहाराष्ट्र : शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेस, पंजाब : काँग्रेस, पश्चिम बंगाल : तृणमूल काँग्रेस, राजस्थान : काँग्रेस, नवी दिल्ली : आम आदमी पक्ष, छत्तीसगड : काँग्रेस, झारखंड : झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ : डावी आघाडी 

विजेंदरचा खेलरत्न परत करण्याचा इशारा; कलाकारांकडून समर्थन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास खेलरत्न पुरस्कार परत करू, असे विजेंदरसिंग यांनी जाहीर केले आहे. आंदोलनाला सोनू सूद, अभिनेत्री तापसी पन्नू, ऊर्मिला मातोंडकर, रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, बॉक्सर विजेंदर सिंग, क्रिकेटपटू हरभजनसिंग आदींनी पाठिंबा दिला आहे.  अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ यांनी आंदोलनाला पाठिंबा देत निदर्शकांना १ कोटी रुपयांची देणगीही दिली.  

शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने न सोडवल्यास देशभरातील लोक या आंदोलनात उतरतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शरद पवार लवकरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीIndiaभारत