सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:46 IST2025-11-10T12:45:43+5:302025-11-10T12:46:26+5:30
चंदीगड: हरियाणाचे पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी नुकतेच एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे, ज्यामुळे ऑटोमोबाइल विश्वातच नाही तर ...

सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
चंदीगड: हरियाणाचे पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी नुकतेच एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे, ज्यामुळे ऑटोमोबाइल विश्वातच नाही तर गुन्हेगारीसह सामान्यांमध्येही मोठी चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील बहुतेक गुन्हेगार आणि 'बदमाश' हे थार एसयूव्ही आणि बुलेट मोटारसायकलचा वापर करतात, असे ते म्हणाले आहेत. सिंह यांच्या या विधानाला सोशल मीडियावर मोठे समर्थन मिळत आहे.
एका कार्यक्रमात बोलताना डीजीपी सिंह म्हणाले, "आता थार गाडी आहे, तिला वापरण्याचा काय अर्थ आहे? बुलेट मोटारसायकल आहे, राज्यातील सर्व गुन्हेगार याच वाहनांवर फिरतात. तुम्ही कोणत्या प्रकारच्या वाहनाची निवड करता, हे तुमची मानसिकता दर्शवते."
'थार हे स्टेटमेंट, दादागिरीचे प्रतीक'
डीजीपी यांनी थारला केवळ एक वाहन न मानता 'एक स्टेटमेंट' (निवेदन) संबोधले. "थार गाडी नाही, तर ती एक स्टेटमेंट आहे, की 'आम्ही असे आहोत'. म्हणजेच ते दादागिरीचे प्रतीक आहे. दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत? दादागिरीही करायची आणि कायद्याच्या कचाट्यातून सुटायचेही," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या विधानाला त्यांनी एका घटनेचा आधार दिला. एका एसीपीच्या मुलाने थारने एका व्यक्तीला चिरडले होते. डीजीपींनी त्या मुलाच्या वडिलांना थेट विचारले की, थार कोणाच्या नावावर आहे? त्यावर 'माझ्या नावावर' असे उत्तर आल्यावर डीजीपी म्हणाले, 'मग बदमाश तूच आहेस!' मुलगा नंतर असे सिंह म्हणाले. आम्ही नंतर किती पोलिसांकडे थार गाड्या आहेत याची यादीच काढली होती, असाहीी खुलासा सिंह यांनी केला.
डीजीपी यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्या मताला दुजोरा दिला आहे, तर काही लोकांनी, 'साध्या आणि सामान्य लोकांनी ही लोकप्रिय वाहने चालवू नयेत का?' असा सवाल उपस्थित केला आहे.