ईटानगर- अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात हवाई दलाचं दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, विमानाच्या अवशेषांपर्यंत बचाव पथक पोहोचल्यानंतर हवाई दलानं सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची खातरजमा केली आहे. या अपघातात सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची सूचना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंतही पोहोचवण्यात आली आहे. हवाई दलानं ट्विट करत याची माहिती दिली आहे.तत्पूर्वी 15 सदस्याचं बचाव पथक आज सकाळी दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषापर्यंत पोहोचलं. अवशेषाची तपासणी केली असता विमानातील कोणताही सदस्य जिवंत राहिला नसल्याचं हवाई दलानं स्पष्ट केलं आहे. या बचाव पथकामध्ये एअरफोर्स, लष्कराचे जवान आणि गिर्यारोहकांचा समावेश होता.
हवाई दलाच्या दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 13:27 IST
अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात हवाई दलाचं दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
हवाई दलाच्या दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 जणांचा मृत्यू
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}