All 13 bodies and black box of indian air force AN 32 transport aircraft recovered | हवाई दलाच्या अपघातग्रस्त विमानातील १३ जणांचे मृतदेह, ब्लॅकबॉक्स सापडला
हवाई दलाच्या अपघातग्रस्त विमानातील १३ जणांचे मृतदेह, ब्लॅकबॉक्स सापडला

ईटानगर: अरुणाचल प्रदेशातल्या सियांगमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या हवाई दलाच्या एएन-३२ विमानातल्या सर्व १३ जणांचे मृतदेह सापडले आहेत. याशिवाय अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्सदेखील हाती लागला आहे. चॉपर्सच्या मदतीनं हे मृतदेह आणले जातील.
हवाई दलाचं विमान 3 जूनला बेपत्ता झालं. यामध्ये हवाई दलाचे 13 जवान होते. आज सकाळी बचाव दल दुर्घटनाग्रस्त विमानापर्यंत पोहोचलं. विमानातील सर्व जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती बचाव दलाकडून देण्यात आली. या विमानातून प्रवास करत असलेल्या सर्व जवानांचे मृतदेह आणि ब्लॅक बॉक्स बचाव दलाच्या हाती लागले आहेत. हेलिकॉप्टरच्या मदतीनं मृतदेह दुर्घटनास्थळावरुन आणले जाणार आहेत. 
15 सदस्याचं बचाव पथक आज सकाळी दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषापर्यंत पोहोचलं. अवशेषाची तपासणी केली असता विमानातील कोणताही सदस्य जिवंत राहिला नसल्याचं हवाई दलानं स्पष्ट केलं. तशी माहिती हवाई दलानं ट्विट करुन दिली. या बचाव पथकामध्ये एअरफोर्स, लष्कराचे जवान आणि गिर्यारोहकांचा समावेश होता. बचाव पथकाला एअरलिफ्ट करून विमानाच्या अवशेषांपर्यंत नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना हेलिड्रॉप केलं. मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता विमान AN-32 अवशेष अरुणाचलमधील सियांग जिल्ह्यात दिसले होते. दुर्घटनाग्रस्त विमान फारच उंचावर आणि घनदाट जंगलामध्ये आहे. अशा ठिकाणी पोहोचणं अतिशय आव्हानात्मक होतं.


Web Title: All 13 bodies and black box of indian air force AN 32 transport aircraft recovered
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.