Akhilesh Yadav's Convey Accident: अखिलेश यादवांच्या ताफ्याला अपघात; चार कार एकमेकांवर आदळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 16:10 IST2023-02-03T16:09:42+5:302023-02-03T16:10:02+5:30

अखिलेश यादव हे मोठ्या ताफ्यासह एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जात होते. यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

Akhilesh Yadav's Conveyance Accident; Four cars collided with each other | Akhilesh Yadav's Convey Accident: अखिलेश यादवांच्या ताफ्याला अपघात; चार कार एकमेकांवर आदळल्या

Akhilesh Yadav's Convey Accident: अखिलेश यादवांच्या ताफ्याला अपघात; चार कार एकमेकांवर आदळल्या

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या बाबत महत्वाची बातमी आली आहे. उत्तर प्रदेशच्य़ा हरदोईमध्ये त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला मोठा अपघात झाला आहे. 

अखिलेश यादव हे मोठ्या ताफ्यासह एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जात होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील चार वाहने एकमेकांवर आदळली आहेत. यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

अखिलेश हे हरपालपूरच्या बैठापूरमध्ये जात होते. तेव्हा मल्लावा बिलग्राम रोडवरील खेमीपूर गावाजवळ हा अपघात झाला आहे. अपघातानंतर काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये चारपेक्षा अधिक गाड्या दुर्घटनाग्रस्त दिसत आहेत. तर गाड्यांजवळ लोक जमा झालेले दिसत असून अॅम्बुलन्सही दिसत आहे. 

जवळपास सहा ते सात लोक जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. अखिलेश यांच्या ताफ्यात मागून जात असलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांना अपघात झाला आहे. 

Web Title: Akhilesh Yadav's Conveyance Accident; Four cars collided with each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.