शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

UP Election 2022: “एकत्र मिळून BJP ला साफ करून टाकू”; अखिलेश यादव भेटीनंतर ओपी राजभर यांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 9:42 AM

UP Election 2022: समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्देसपा आणि सुभासपा एक साथ, उत्तर प्रदेशमध्ये भाजप साफजनता भाजप आणि योगी सरकारला कंटाळली - राजभरयोगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर जनता नाराज - राजभर

लखनऊ:उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Election 2022) जसजशी जवळ येऊ लागली आहे, तशी राजकीय समीकरणेही वेगाने फिरू लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी विरोधी पक्ष सरसावल्याचे दिसत आहे. यातच आता सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली. यानंतर समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आली. यावेळी एकत्र मिळून भाजपला विधानसभा निवडणुकीत चीतपट करू, असा एल्गार यावेळी करण्यात आला. 

यासंदर्भात समाजवादी पक्षाकडून करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, वंचित, शोषित, मागासवर्ग, दलित, महिला, शेतकरी, तरुण अशा सर्व कमकुवत वर्गांसाठी समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष मिळून एकत्रितपणे लढेल. सपा आणि सुभासपा एक साथ, उत्तर प्रदेशमध्ये भाजप साफ, असा एल्गार करण्यात आला आहे. 

अबकी बार भाजप साफ

समाजवादी पक्षासह ओमप्रकाश राजभर यांनीही ट्विट केले आहे. अबकी बार, भाजप साफ, समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आले एकत्र. दलित, मागास तसेच अल्पसंख्यकांसह सर्व वर्गांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारचे दिवस उरलेत फक्त चार, असा खोचक टोला ओमप्रकाश राजभर यांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशमधील जनता भाजप आणि योगी सरकारला कंटाळली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर जनता नाराज आहे. या दोन्ही पक्षाचे गठबंधन झाले, तर मऊ, बलिया, गाजीपूर, आझमगड, जौनपूर, आंबेडकर नगर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये भाजपला एकही जागा जिंकता येणार नाही, असा दावा ओमप्रकाश राजभर यांनी केला. 

दरम्यान, अखिलेश यादव यांनी यापूर्वी कोणत्याही बड्या राजकीय पक्षासह युती किंवा आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत विधानसभा निवडणुका होतील, असे म्हटले जात आहे. सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४०३ जागांवर विजय मिळाला होता. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करून ही निवडणूक लढवली होती. समाजवादी पक्षाला ४७ तर, काँग्रेसला ७ जागांवर समाधान मानावे लागले होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपा