शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ब्रिजभूषण यांना सपाकडून तिकीट? अखिलेश यांच्या पाठोपाठ डिंपल यादवांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 15:10 IST

Lok Sabha Election 2024: राजकीय पक्ष कामाला लागले असून आपापल्या परीने उमेदवारांची घोषणा केली जात आहे.

UP Lok Sabha Election: आगामी लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून आपापल्या परीने उमेदवारांची घोषणा केली जात आहे. सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशातील निकाल देशाची सत्ता ठरवत असतो. इथून एकूण ८० खासदार निवडून जातात. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्ष आता दुसरी यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या यादीत भाजपने उत्तर प्रदेशातील ५१ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. भाजपने अनेक दिग्गजांची नावे यादीत समाविष्ट केली होती. त्याचबरोबर अनेक विद्यमान खासदारांच्या तिकिटांवरही कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या यादीत कोणाला संधी मिळते आणि कोणाचा पत्ता कट होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नव्हते. अशातच ते समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली. ब्रिजभूषण सिंह यांना सपाकडून तिकीट मिळणार असल्याच्या चर्चांवर सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी खासदार डिंपल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिजभूषण समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, यात काही तथ्य आहे असे मला वाटत नाही.

अखिलेश यादव यांचं मोठं विधान माध्यमांशी बोलताना उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, भाजपचा एकही खासदार आमच्या संपर्कात नाही. पण तुम्ही असे म्हणत असाल तर आम्ही त्यांना नक्कीच तिकीट देऊ. अशी परिस्थिती उद्भवल्यास पत्रकाराचे म्हणणे मान्य करू. खरं तर भाजपच्या पहिल्या यादीत ब्रिजभूषण शरण सिंह यांचे नाव नसले तरी कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून पक्षाने कोणालाही उमेदवारी दिलेली नाही. पण, भाजपकडून त्यांचे तिकीट कापले जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, ब्रिजभूषण यांच्या जागी पक्ष त्यांची पत्नी केतकी देवी आणि मुलगा प्रतीक भूषण सिंह यांपैकी एकाला कैसरगंजमधून उमेदवारी देऊ शकतो.

दरम्यान, महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते आणि त्यांच्याविरोधात दीर्घ आंदोलन देखील केले होते. यामुळे भाजपवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीतही त्यांचे नाव नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहAkhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा