Akhilesh Yadav: अखिलेश यादवांचा वेगळाच एक्झिट पोल, युपीत समाजवादीचंच सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 04:31 PM2022-03-08T16:31:32+5:302022-03-08T16:42:35+5:30

उत्तर प्रदेशातील शेवटच्या टप्प्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमधून भाजपच सर्वात मोठा पक्ष दिसत आहे.

Akhilesh Yadav: Akhilesh Yadav's separate exit polls, Samajwadi Party government in UP | Akhilesh Yadav: अखिलेश यादवांचा वेगळाच एक्झिट पोल, युपीत समाजवादीचंच सरकार

Akhilesh Yadav: अखिलेश यादवांचा वेगळाच एक्झिट पोल, युपीत समाजवादीचंच सरकार

Next

UP assembly election 2022:  दोन महिन्यांपर्यंत चालणाऱ्या निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रत्येक पक्ष आणि नेता स्वत:च्या विजयाचा दावा करत असतो. पण ज्यावेळी निकाल जाहीर होतात त्यावेळी वेगळच चित्र पाहायला मिळतं. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मतानुसार उत्तर प्रदेशात मुख्यत्वे बहुतांश जागांवर केवळ दोन पक्षांमध्ये लढत पाहायला मिळते. त्यामुळे यावेळी डिपॉझिट जप्त होणाऱ्या उमेदवारांचा आकडा यावेळी वाढू शकतो. मात्र, अनेक एक्झिट पोलमधून भाजपलाच बहुमत दिसत आहे. यासंदर्भात अखिलेश यादव यांनी आपणच सरकार स्थापन करत असल्याचं म्हटलंय. 

उत्तर प्रदेशातील शेवटच्या टप्प्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमधून भाजपच सर्वात मोठा पक्ष दिसत आहे. तर, दुसऱ्या क्रमांकांवर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला पंसती मिळाली आहे. मात्र, युपीत समाजवादी पक्षाचंच सरकार येणार असल्याचं अखिलेश यादव यांनी एक्झिट पोलनंतरही म्हटले आहे. यादव यांनी स्वत:चा एक्झिट पोल दिला आहे. जवळपास 11 एक्झिट पोलने भाजपला अधिक संख्याबळ दाखवले आहे. मात्र, अखिलेश यादव यांनी स्वत:चा एक्झिट पोल दिलाय. त्यानुसार, युपीत समाजवादी पक्षाचीच सत्ता येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

सातव्या आणि निर्णायक टप्प्यातील मतदानानंतर समाजवादी पक्षाच्या आघाडीला विजयापेक्षा अधिक पुढे घेऊन गेल्याबद्दल सर्वच मतदारांचे आणि विशेषत: युवा कार्यकर्त्यांचे आभार. आपण सरकार बनवत आहोत... असे अखिलेश यादव यांनी ट्वटि करुन म्हटले आहे. त्यामुळे, अखिलेश यादव यांनी सर्वच एक्झिट पोलपेक्षा स्वत:चा वेगळाच एक्झिट पोल सांगितलाय. 

Web Title: Akhilesh Yadav: Akhilesh Yadav's separate exit polls, Samajwadi Party government in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.