शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

आकाश अंबानीचं ठरलं! 'ही' होणार देशातील सर्वात श्रीमंत घराण्याची सून?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 11:02 AM

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी विवाहबंधनात अडकणार

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यावर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हीरा व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्र्लोका हिच्यासोबत त्याचं वर्षअखेरीस लग्न होणार आहे. डिसेंबम महिन्यात दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. श्र्लोका ही रसेल मेहता यांची सर्वात छोटी मुलगी आहे.

मात्र, अंबानी आणि मेहता या दोन्ही कुटुंबियांकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण, येत्या काही आठवड्यांमध्ये दोघांच्या साखरपुड्याची घोषणा होऊ शकते अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंबानी आणि मेहता कुटुंब एकमेकांना पहिल्यापासून ओळखतात. आकाश आणि श्र्लोका या दोघांचं शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकत्र झालं आहे. रसेल मेहता हे रोसी ब्लू डायमंडचे प्रमुख आहेत. 

आकाश आणि श्र्लोका यांच्या लग्नाबाबत माहिती घेण्यासाठी मीडियाकडून अंबानी कुटुंब आणि रिलायन्स इंडस्ट्रीच्या प्रवक्त्यांना इ-मेल पाठवण्यात आला पण त्यावर कोणतंही उत्तर आलेलं नाही. अंबानी कुटुंबाच्या जवळच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजूनपर्यंत आकाशच्या लग्नाची किंवा साखरपुड्याची तारीख निश्चीत झालेली नाही. मेहता यांच्या रोसी ब्लू डायमंड कंपनीलाही यासंबंधी मेल पाठवण्यात आला पण त्यांच्याकडूनही उत्तर आलेलं नाही.  

टॅग्स :Akash Ambaniआकाश अंबानीMukesh Ambaniमुकेश अंबानी