डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:32 IST2025-11-08T16:31:23+5:302025-11-08T16:32:10+5:30
याप्रकरणी नौगाम येथील पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 162/2025 अंतर्गत, भारतीय बंदुक कायद्याच्या विविध कलमान्वये तसेच UAPA च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
जम्मू-कश्मीरच्या श्रीनगरमध्ये अनंतनागचे माजी सरकारी डॉक्टर अदील अहमद रदर यांच्या लॉकरमधून AK-47 रायफल जप्त करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. अदील 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत GMC अनंतनागमध्ये कार्यरत होते. ते अनंतनागमधील जलगुंडचे रहिवासी आहेत.
याप्रकरणी नौगाम येथील पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 162/2025 अंतर्गत, भारतीय बंदुक कायद्याच्या विविध कलमान्वये तसेच UAPA च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आणि तपास यंत्रणा या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
अदील अहमद रदर यांच्यावर, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याची शक्यता असल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलेल्या शस्त्र आणि इतर पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे.
'हे' सुरक्षा दलांचे मोठे यश -
महत्वाचे म्हणजे, डॉक्टरच्या लॉकरमधून AK-47 रायफल जप्त होणे, हे सुरक्षा दलांचे मोठे यश आहे. या घटनेमुळे संवेदनशील ठिकाणीही शस्त्रं कसे लपवून ठेवली जाऊ शकतात, हे स्पष्ट झाले आहे.
आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू -
श्रीनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली आहे. तपासादरम्यान डिजिटल आणि फिजिकल पुरावे गोळा केली जात आहेत. हे प्रकरण राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा धोका आहे. यामुळे पोलिसांनी प्रचंड सतर्क आहेत. तसेच, दहशतवाद्यांचे नेटवर्क शोधून ते उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.