शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

अजितदादांची मध्यरात्री अचानक दिल्लीवारी; अमित शाह यांच्यासोबत रात्री १ वाजता बैठक, नेमक्या काय हालचाली सुरू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 11:34 IST

Ajit Pawar News: प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांसह अजित पवार काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते.

Ajit Pawar Amit Shah Meeting ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल रात्री उशिरा भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांसह अजित पवार दिल्लीत दाखल झाले होते. त्यानंतर मध्यरात्री १ वाजता त्यांनी अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीतील महायुतीचं जागावाटप आणि निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काय रणनीती हवी, याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आता सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात वेगवान हालचाली सुरू आहेत. लोकसभेतील कामगिरी विधानसभेतही कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील आहेत, तर दुसरीकडे, लोकसभेत बसलेल्या फटक्याची विधानसभेत पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे. यादृष्टीनेच भाजप कार्यकर्त्यांना बळ मिळावं, यासाठी दोन दिवसांपूर्वी अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे इथं भाजपचं राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळीही अजित पवारांनी पुण्यातील हॉटेलमध्ये अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा एकदा शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचल्याने महायुतीच्या गोटात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाचा तातडीने विस्तार करून सरकारच्या कामाची गती वाढवायला हवी, अशी भूमिका अजित पवार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडली. मात्र निवडणूक निकालाला दोन महिने होत आले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही काल अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

अमित शाह-अजित पवारांची पुण्यात भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे २० आणि २१ जुलै रोजी निमित्ताने पुण्यात होते. यावेळीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची बैठक झाली होती. शरद पवार यांना शह देण्यासंदर्भात मुख्यत्वे चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. शाह यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी भाजपच्या वीसेक ज्येष्ठ नेते, आमदारांशी चर्चा केली होती.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAmit Shahअमित शाहNew Delhiनवी दिल्लीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४