अजित पवारांचा बळी घेणाऱ्या विमान कंपनीला 'त्या' चौकशीतून वगळले; डीजीसीएचा धक्कादायक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 06:21 IST2026-02-12T06:18:40+5:302026-02-12T06:21:42+5:30

पहिल्या टप्प्यात प्रमुख १४ कंपन्यांचे स्पेशल ऑडिट करण्यात येणार आहे. मात्र, त्यात अजित पवारांच्या विमान अपघातास कारणीभूत कंपनीचा समावेश नाही.

Ajit Pawar Death: Special audit of charter airlines in Country; DGCA takes decision but VRS venture not included | अजित पवारांचा बळी घेणाऱ्या विमान कंपनीला 'त्या' चौकशीतून वगळले; डीजीसीएचा धक्कादायक निर्णय

अजित पवारांचा बळी घेणाऱ्या विमान कंपनीला 'त्या' चौकशीतून वगळले; डीजीसीएचा धक्कादायक निर्णय

मुंबई - अजित पवार यांचा चार्टर विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानाचे स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रमुख १४ कंपन्यांचे स्पेशल ऑडिट करण्यात येणार आहे. मात्र, त्यात अजित पवारांच्या विमान अपघातास कारणीभूत कंपनीचा समावेश नाही. या तपासणीत विमानाची देखभाल कशी आहे, इंजिन व अन्य तांत्रिक गोष्टी कशा पद्धतीने जोपासण्याला आहेत, नियमित तांत्रिक तपासणी होते का, आदी मुद्यांवर भर देण्यात आला आहे. 

या कंपन्यांची होणार तपासणी

पहिल्या टप्प्यात ज्या कंपन्यांची तपासणी होणार आहे, त्यामध्ये एअर चार्टर सर्व्हिसेस प्रा. लि., ए. आर. एअरवेज प्रा. लि., एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर, चिप्सन एव्हिएशन प्रा. लि. डेक्कन चार्टर प्रा. लि., ग्लोबल व्हेक्ट्रा हेलिकॉर्प लि., इन्डो - पॅसिफीक एव्हिएशन प्रा. लि., इंडिया फ्लाय सेफ एव्हिएशन लि., कर्णावती एव्हिएशन प्रा. लि., पवन हंस लि., राजस एरोस्पोटर्स प्रा. लि., रेडबर्ड एअरवेज प्रा. लि., रिलायन्स कमर्शिय डिलर्स लि., झेस्ट एव्हिएशन लि. या कंपन्यांचा समावेश आहे.

व्हीआरएस व्हेन्चरचा समावेश नाही

धक्कादायक गोष्ट म्हणजे पहिल्या टप्प्यात ज्या १४ कंपन्यांची तपासणी होणार आहे, त्यात अजित पवार यांच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या विमानाच्या व्हीआरएस व्हेन्चर कंपनीचा समावेश नाही. या विशेष ऑडिटकरिता डीजीसीएने विशेष पथक स्थापन केले असून, येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत या कंपन्यांसंदर्भातील अहवाल देण्याचे आदेश या विशेष पथकाला देण्यात आले आहेत.

Web Title : अजित पवार का विमान हादसा: डीजीसीए ऑडिट से कंपनी बाहर, सवाल उठे।

Web Summary : अजित पवार के विमान हादसे के बाद, डीजीसीए ने चार्टर कंपनियों के ऑडिट का आदेश दिया। हैरानी की बात है, पवार के दुर्घटना के लिए जिम्मेदार कंपनी को शुरुआती ऑडिट से बाहर रखा गया है, जिससे पारदर्शिता और जवाबदेही पर चिंताएं बढ़ गई हैं। चौदह अन्य कंपनियों का ऑडिट किया जाएगा।

Web Title : Ajit Pawar's plane crash: Company excluded from DGCA audit raises questions.

Web Summary : Following Ajit Pawar's fatal plane crash, DGCA ordered audits of charter companies. Shockingly, the company responsible for Pawar's accident is excluded from the initial audit, raising concerns about transparency and accountability. Fourteen other companies will be audited.