१८ शहरांतील हवा होतेय भयंकर विषारी, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुण्याचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 05:03 AM2019-11-25T05:03:09+5:302019-11-25T08:47:16+5:30

दिल्ली शहराची चर्चा भयंकर हवा प्रदूषणासाठी देशभर होत असली तरी महाराष्ट्रातील १८ शहरांतील हवादेखील विषारी बनत आहे.

 The air was very poisonous in two cities, including Nagpur, Aurangabad, Nashik, Mumbai, Pune | १८ शहरांतील हवा होतेय भयंकर विषारी, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुण्याचा समावेश

१८ शहरांतील हवा होतेय भयंकर विषारी, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुण्याचा समावेश

Next

- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : दिल्ली शहराची चर्चा भयंकर हवा प्रदूषणासाठी देशभर होत असली तरी महाराष्ट्रातील १८ शहरांतील हवादेखील विषारी बनत आहे. त्यात नागपूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे व नाशिकचा प्रामुख्याने समावेश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडील आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील या १८ शहरांना देशातील सगळ््यात जास्त प्रदूषित शहरांत समाविष्ट केले गेले आहे. पर्यावरण व वनमंत्री बाबूल सुप्रियो यांनी या लोकसभेत आकडेवारीचा हवाला घेऊन म्हटले की, महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, सांगली, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे आणि उल्हासनगर सगळ््यात जास्त प्रदूषित शहरांत समावेश आहे. सुप्रियो   यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रति क्युबिक घन मीटर हवेत विषारी सल्फरडाय आॅक्साईडचे सर्वात जास्त प्रमाण पुणे (२७), बदलापूर (२४) आणि उल्हासनगरमध्ये नोंदवले गेले.


नायट्रोजन आॅक्साईड प्रति घन मीटर हवा २०१८ मध्ये सगळ््यात जास्त पुणे (७५), बदलापूर (६७) आणि उल्हासनगरमध्ये (५८) होती. धोकादायक वात कण पीएम १० सगळ््यात जास्त मुंबई (१६६), चंद्रपूर (१४९) आणि बदलापूरच्या (१४४) हवेत होते.

बोईसरबाबत केंद्राकडे आकडेवारी नाही
राजेंद्र गावित यांनी देश आणि विशेषत: बोईसरमधील प्रदूषणाबाबत माहिती मागितली होती. सुप्रियो म्हणाले की, राष्ट्रीय वायू गुणवत्ता निगराणी कार्यक्रमात समाविष्ट नसल्यामुळे गुणवत्तेची माहिती केंद्र सरकारकडे नाही.

Web Title:  The air was very poisonous in two cities, including Nagpur, Aurangabad, Nashik, Mumbai, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.