Air strike will help BJP win 22 seats in Karnataka: BS Yeddyurappa | एअर स्ट्राइकमुळे कर्नाटकात 22 हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल - येडियुरप्पा

एअर स्ट्राइकमुळे कर्नाटकात 22 हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल - येडियुरप्पा

ठळक मुद्देपुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने गेल्या मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे.कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचा फायदा पक्षाला होईल असे म्हटले आहे.'येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल'

बंगळुरु : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने गेल्या मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. यानंतर संतापलेल्या पाकिस्ताने भारताविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे. यातच भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचा भाजपा राजकीय फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. 

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचा फायदा पक्षाला होईल असे म्हटले आहे. दिवसेंदिवस भाजपाच्या बाजूने लहर वाढत चालली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केल्यानंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनात लहर बनली आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून येणार आहे. तसेच, या कारवाईमुळे कर्नाटकात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल, असे बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.

आपल्या माहितीसाठी, गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात एकूण 28 जागांपैकी भाजपा 17, काँग्रेस 9 आणि जेडीएसने  2  जागांवर विजय मिळवला होता. मात्र, गेल्यावर्षी बेल्लारी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. त्यामुळे सध्या भाजपाकडे 16 जागा आहे.  

दरम्यान,  14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

Web Title: Air strike will help BJP win 22 seats in Karnataka: BS Yeddyurappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.