विमानात किंवा विमानतळावर 'हे' शब्द बोलू नका, अन्यथा होईल कायदेशीर कारवाई...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:08 IST2025-05-14T14:05:13+5:302025-05-14T14:08:52+5:30
Air Plane Rules :विमानतळ आणि विमानांमधील सुरक्षेबाबत खूप कडक नियम आहेत.

विमानात किंवा विमानतळावर 'हे' शब्द बोलू नका, अन्यथा होईल कायदेशीर कारवाई...
Air Plane Rules : आजच्या काळात विमान प्रवास, हा सर्वात जलद आणि सोयीस्कर प्रवासांपैकी एक आहे. पण, हवाई प्रवास करताना काही खबरदारी घेणे गरजेचे असते. विमानतळ आणि विमानांमधील सुरक्षेबाबत खूप कडक नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न केल्याने किंवा चुकीचे शब्द वापरल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. अलिकडेच अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, जिथे विमानातून प्रवास करणाऱ्या लोकांनी काही विशिष्ट शब्दांचा वापर केल्यामुळे केवळ विमानाला उशीर झाला नाही, तर त्यांना कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागले.
हे शब्द वापरल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता
हे शब्द सामान्य वाटू शकतात, परंतु त्यांचा वापर सुरक्षा एजन्सींना त्वरित सतर्क करतो. विमानतळ किंवा विमानात बॉम्ब, बंदूक, चाकू, दहशतवादी, अपहरण, स्फोटके, अपघात, जैविक शस्त्रे आणि तस्करी किंवा ड्रग्ज यासारखे शब्द अजिबात वापरू नयेत. हे शब्द ऐकताच सुरक्षा कर्मचारी ताबडतोब कारवाई करतात, ज्यामुळे तुमचा प्रवास लांबू शकतो आणि कायदेशीर अडचणी देखील येऊ शकतात. उदाहरणार्थ, जर विमानतळावर किंवा विमानात कोणी गंमतीने म्हटले की, 'माझ्या बॅगेत बॉम्ब आहे', तर त्याला ताबडतोब ताब्यात घेतले जाऊ शकते.
आपल्या मुलांना समजावून सांगा
असे अनेकदा घडते की, लोकांनी विनोदाने किंवा इतर कोणत्याही कारणास्तव असे शब्द वापरले, ज्यामुळे ते अडचणीत आले आहेत. अशा घटना टाळण्यासाठी प्रवास करताना तुमच्या संभाषणात काळजी घ्या. विशेषतः, विमानतळाच्या सुरक्षेबद्दल शंका निर्माण करू शकतील अशा पोस्ट किंवा टिप्पणी सोशल मीडियावर करणे टाळा. तसेच, तुमचे सामान नीट तपासा आणि कोणतीही संशयास्पद वस्तू सोबत ठेवू नका. शंका असल्यास विमानतळावरील मदत केंद्राशी संपर्क साधा. याशिवाय, मुलांना या शब्दांच्या चुकीच्या वापराबद्दल देखील समजावून सांगा.