शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:02 IST

Air India Plane Crash Ahmedabad: विमान अहमदाबादहून लंडनला जात असून त्यात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी असल्याची माहिती

Air India Plane Crash Ahmedabad: गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी एक मोठा विमानअपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानालाअपघात झाला. अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. विमानाने उड्डाण केल्या-केल्या लगेचच मेघानीनगरच्या रहिवासी परिसरात हे विमान कोसळले. विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. वृत्तसंस्था एएनआयनुसार, विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. या घटनेत किती जीवित आणि वित्तहानी झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. याचदरम्यान, एअर इंडियाने या अपघाताबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

एअर इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, अहमदाबाद-लंडन गॅटविक ही विमान उड्डाण घेतल्यानंतर फ्लाइट AI171 चा १२ जून २०२५ रोजी अपघात झाला आणि मोठी दुर्घटना झाली. सध्या, आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स http://airindia.com आणि आमच्या X हँडलवर (https://x.com/airindia) शेअर करू, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिले आहे.

१.३१ वाजता उड्डाण, १.३८ वाजता शेवटचा सिग्नल

दरम्यान, या विमानाच्या अपघातानंतर काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळ हा अपघात झाला. हा परिसर सिव्हिल हॉस्पिटलजवळ आहे. विमान अपघातात मोठे नुकसान झाले आहे. राज्य पोलिस नियंत्रण कक्षाने अपघाताची पुष्टी केली आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात दुपारी १.३१ मिनिटांनी विमानाचे उड्डाण झाले आणि १.३८ मिनिटांनी विमानातून शेवटचा सिग्नल मिळाला. त्यानंतर हे विमान कोसळले.

अमित शाह यांनी घेतली अपघाताची माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि डीजीपी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी विमान अपघाताची प्राथमिक माहिती घेतली. अमित शाह यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. एनएसजी टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील विमानात चढत असल्याची माहिती समोर येत आहे. तर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सुरतहून नुकतेच अहमदाबादला रवाना झाले आहेत.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाGujaratगुजरातairplaneविमानAirportविमानतळAccidentअपघातAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद