देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:49 IST2025-11-05T17:29:51+5:302025-11-05T17:49:45+5:30
बुधवारी एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन झाला आहे, यामुळे दिल्लीसह अनेक विमानतळांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या.

देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
देशभरातील अनेक विमानतळांवर आज बुधवारी एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर आली. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सर्व्हर बिघाडामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या लांब रांगा लागल्याचे दिसून आले.
याबाबत दिल्ली विमानतळावरील एका अधिकाऱ्याने माहिती दिली. देशातील सर्व विमानतळांवर एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन झाल्याची पुष्टी केली. लवकरच ही समस्या दुरुस्त केली जाईल असेही सांगण्यात आले.
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
दिल्लीच्या टर्मिनल २ वर प्रवाशांची गर्दी
'दुपारी ३ वाजल्यापासून टर्मिनल २ मध्ये सर्व्हरमध्ये समस्या येत आहेत, यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. T2 वरून निघणारे प्रवासी त्रासात इकडे तिकडे फिरताना दिसले. विमानतळावरील एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला आहे, यामुळे सामान खाली उतरण्यास अडथळा येत आहे.
विमानतळावर प्रवासी चिंतेत
एअर इंडियाच्या सर्व्हरमध्ये कालपासून समस्या येत आहेत. एका प्रवाशाने सांगितले की ,काल डेहराडूनहून दिल्लीला आली होती आणि दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणारी कनेक्टिंग फ्लाइट होती. सर्व्हरमधील समस्या आणि उड्डाण विलंबामुळे ती फ्लाइट चुकली, यामुळे ती खूप अस्वस्थ झाली.
मॅन्युअल बोर्डिंग पुन्हा सुरू
सॉफ्टवेअरच्या समस्यांमुळे, एअरलाइनने आता तिरुवनंतपुरम आणि पटना येथे जाणाऱ्या फ्लाइटसाठी मॅन्युअल चेक-इन सुरू केले आहे. ही मॅन्युअल चेक-इन प्रक्रिया बरीच मंदावली आहे.