शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:48 IST

Black Box Data Recover of Air India Plane Crash: विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती या ब्लॅक बॉक्समधून मिळणार असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यावर आहेत.

Ahmedabad Plane Crash: १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमानअपघातामुळे अवघ्या देशाला हादरा बसला होता. या भीषण अपघातातविमानातील प्रवाशांचा आणि क्रू मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ एका प्रवाशाला या अपघातातून आपला जीव वाचवता आला आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला होता, ज्याची तपासणी सुरू होती. अखेर तपास पथकाला यात यश मिळाले आहे. 

विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, यांची माहिती या ब्लॅक बॉक्समधून मिळणार असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यावर होत्या. दरम्यान आता या ब्लॅक बॉक्सच्या तपासबद्दलची नवी आणि मोठी अपडेट समोर आली आहे. २४ जून रोजी विमानाच्या समोरील ब्लॅक बॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि २५ जून रोजी त्याच्या मेमरी मॉड्यूलमध्ये यशस्वीरित्या प्रवेश करण्यात आला. तर, आता त्याचा डेटा AAIB लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला आहे. लवकरच या अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

ब्लॅक बॉक्सचा तपास कुठवर आला?अहमदाबाद विमान अपघातातील विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटाचा तपास अद्याप सुरू आहे. सध्या, सीव्हीआर आणि एफडीआर डेटाचे विश्लेषण केले जात आहे. अपघाताचे कारण शोधणे आणि विमान वाहतूक सुरक्षा वाढविण्यासाठी, तसेच भविष्यातील दुर्घटना रोखण्यासाठी योगदान देणारे घटक ओळखणे हे या प्रयत्नांचे उद्दिष्ट असल्याचे, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे. 'ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय? विमान अपघातानंतर सर्वात आधी का शोधतात याला – जाणून घ्या नेमकं काम.

विमानाचा भीषण अपघात!१२ जून रोजी लंडनकडे जाणारे बोइंग ड्रीमलाइनर विमान टेकऑफनंतर काही सेकंदातच कोसळले. ते थेट विमानतळाच्या अगदी बाहेर असलेल्या मेघानी नगर येथील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या निवासी कॅम्पसमध्ये पडले. एअर इंडियाच्या बोइंग ड्रीमलाइनर विमानाला अहमदाबादमध्ये झालेल्या या अपघातात २७५ लोकांचा बळी गेला आहे. यात विमानात असलेले २४१ प्रवासी आणि जमिनीवरील ३४ लोकांचा समावेश आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातairplaneविमान