"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 07:11 IST2025-06-14T07:08:47+5:302025-06-14T07:11:15+5:30

Ahmedabad Air India Plane Crash: मी माझ्या डोळ्यासमोर लोकांना मरताना पाहिले. खरेतर अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु त्या लोकांच्या बाजूला वसतिगृहाची भिंत होती. मात्र, मी जेथे बसलो तेथे थोडीशी जागा होती. त्यामुळे मी बचावलो. मला मात्र मी जिवंत आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही.

Air India Plane Crash: "People could still have survived, but...", claims sole survivor of plane crash | "अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा

"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा

अहमदाबाद : विमान अपघातातून बचावलेले एकमेव प्रवासी ४० वर्षीय विश्वास कुमार रमेश यांनी आपण बचावल्याचा थरारक अनुभव सांगितला.
त्यांनी सांगितले की, त्यांची सीट ११ए ही दुर्दैवी विमानाच्या डाव्या बाजूला आपत्कालीन दरवाजाजवळ होती. अपघात झाल्यानंतर विमानाचा भाग वसतिगृहावर पडला. विमानाचा दरवाजा तुटलेला पाहून एका क्षणात मनात विचार आला की, मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यानंतर मी विमानातून बाहेर पडलो, असे मूळचे दीवचे असलेले ब्रिटिश व्यावसायिक रमेश म्हणाले.

अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु बाजूला...
रमेश म्हणाले की, मी माझ्या डोळ्यासमोर लोकांना मरताना पाहिले. खरेतर अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु त्या लोकांच्या बाजूला वसतिगृहाची भिंत होती. मात्र, मी जेथे बसलो तेथे थोडीशी जागा होती. त्यामुळे मी बचावलो. मला मात्र मी जिवंत आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही.
मी विमानाच्या त्या भागातून बाहेर पडण्यात यशस्वी झालो, परंतु विमानाला आग लागल्याने माझा डावा हात भाजून निघाला. मी विमानातून बाहेर पडल्यावर एका रुग्णवाहिकेतून मला रुग्णालयात नेण्यात आले.
व्हायरल व्हिडीओत जखमी झालेले रमेश रुग्णवाहिकेकडे चालत जाताना दिसत आहेत. ते म्हणाले की, अपघात होताच मला वाटले की, मी मरणार आहे. पण जेव्हा डोळे उघडले, तेव्हा मी जिवंत होतो. मी स्वत:ची सीटवरून सुटका करून घेतली आणि उघड्या जागेतून बाहेर पडलो.

Web Title: Air India Plane Crash: "People could still have survived, but...", claims sole survivor of plane crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.