शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

सॅल्यूट... दीपक साठेंच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली, वाचले अनेकांचे प्राण; भावाची हळवी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 12:18 PM

Air India Plane Crash in Kerla, Latest News : वंदे भारत मिशनमध्ये सहभागी झाल्यानं आनंदी होते दीपक साठे....

कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात केरळमधील कोळीकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना त्याचे दोन तुकडे झाले.  रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये वैमानिक दीपक साठे यांचाही समावेश आहे. दुर्घटनेत नेमकं काय झालं, याबद्दल दीपक साठे यांचा चुलत भाऊ निलेश साठे यांनी हळवी पोस्ट लिहिली आहे. (Air India Express Accident) 

जय महाराष्ट्र!.... उद्धव ठाकरे पुन्हा एकदा देशातील टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये

हे विमान बोर्इंग ७३७ होते व ते ठरल्या वेळी म्हणजे साय. ७.४१ वाजता विमानतळावर उतरले. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार विमानात १७४ प्रौढ प्रवासी, १० तान्ही मुले, दोन वैमानिक व चार विमान कर्मचारी असे एकूण १९० जण होते. कोळीकोडचे विमानतळ डोंगरमाथ्यावर आहे व त्याच्या धावपट्टीच्या दुतर्फा दरी आहे. सुदैवाने धावपट्टीवरून घसरले तेव्हा विमानाचा वेग बराच कमी झाला होता. अनुभवी वैमानिक दीपक साठे आणि अखिलेश कुमार यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. पण, या प्रयत्नांत दोघांचाही मृत्यू झाला. (Air India Express Accident) 

या आहेत भारतातील सर्वात धोकादायक धावपट्ट्या, विमान उतरताना रोखला जातो श्वास

दीपक साठे यांचे चुलत बंधू निलेश साठे यांनी हळवी फेसबुक पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार नेमकं काय झालं, हे समजावण्याचा प्रयत्न केला आहे. निलेश साठे यांनी लिहिलं की,''विमानाचे लँडींग गिअर काम करत नव्हते. भारतीय हवाई दलाचे माजी वैमानिक ( दीपक साठे) यांनी विमानतळाच्या तीन फेऱ्या मारून इंधन संपवलं. यामुळे अपघात होऊनही विमानानं पेट घेतला नाही. विमान लँड करण्यासाठी इंजिन बंद करण्यात आले होते. तीनवेळा विमान आदळले. अशा प्रकारे विमानाची मोठी दुर्घटना होऊनही, अनेक प्रवाशांचे जीव वाचवण्यात वैमानिकांना यश आलं.'' (Air India Express Accident)  

Its hard to believe that Dipak Sathe, my friend more than my cousin, is no more. He was pilot of Air India Express...

Posted by Nilesh Sathe on Friday, August 7, 2020
 त्यांनी पुढे लिहिलं की,''आठड्यापूर्वी त्याचं आणि माझं बोलणं झालं होतं. वंदे भारत मोहिमेबद्दल मी त्याला विचारले, त्याला प्रचंड अभिमान वाटत होता. संयुक्त अरब अमिरातीतून देशवासियांना परत आणण्यासाठी तो आनंदी होता.'' (Air India Express Accident)  

शतकी आघाडी घेऊनही पाकिस्तानची हाराकिरी; तिसऱ्या दिवशी पडल्या 14 विकेट्स  

बोंबला! डुक्करामुळे तो विवस्त्र धावत सुटला, जाणून घ्या व्हायरल फोटोची गंमत...

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसPuneपुणे