England vs Pakistan 1st Test: शतकी आघाडी घेऊनही पाकिस्तानची हाराकिरी; तिसऱ्या दिवशी पडल्या 14 विकेट्स

England vs Pakistan 1st Test: शान मसूदच्या ( 156) शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघानं पहिल्या डावात 326 धावा उभ्या करून इंग्लंडसमोर आव्हान उभे केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 11:06 AM2020-08-08T11:06:56+5:302020-08-08T11:07:42+5:30

whatsapp join usJoin us
England vs Pakistan 1st Test: England have brought this game back into the balance, Pakistan are 137/8, leading by 244 | England vs Pakistan 1st Test: शतकी आघाडी घेऊनही पाकिस्तानची हाराकिरी; तिसऱ्या दिवशी पडल्या 14 विकेट्स

England vs Pakistan 1st Test: शतकी आघाडी घेऊनही पाकिस्तानची हाराकिरी; तिसऱ्या दिवशी पडल्या 14 विकेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs Pakistan 1st Test: शान मसूदच्या ( 156) शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघानं पहिल्या डावात 326 धावा उभ्या करून इंग्लंडसमोर आव्हान उभे केले. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना इंग्लंडचा पहिला डाव 219 धावांत गुंडाळून 107 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानला वर्चस्व गाजवण्याची संधी होती, पंरतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना पाकिस्तानला धक्के दिले. तिसऱ्या दिवशी तब्बल 14 विकेट्स पडल्या.

इंग्लंडकडून तिसऱ्या दिवशी ओली पॉप ( 62) आणि जोस बटलर ( 38) यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्टुअर्ट ब्रॉड ( 29*) साथ दिली, परंतु इंग्लंडला पहिल्या डावात 219 धावा करता आल्या. 107 धावांच्या आघाडीसह पुन्हा मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांना मात्र यावेळी साजेशी खेळी करता आली नाही. पहिल्या डावातील शतकवीर शान मसूद भोपळाही फोडू शकला नाही. स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स, बेन स्टोक्स यांनी पाकिस्तानला धक्के दिले. त्यांचे 8 फलंदाज अवघ्या 137 धावांत माघारी परतले आहे. पाकिस्ताननं तिसऱ्या दिवसअखेर 244 धावांची आघाडी घेतली आहे. यासीर शाह आणि मोहम्मद अब्बास खेळत आहेत. 


Web Title: England vs Pakistan 1st Test: England have brought this game back into the balance, Pakistan are 137/8, leading by 244

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.