फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 19:44 IST2025-08-10T19:43:43+5:302025-08-10T19:44:06+5:30
Air India Freedom Sale: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एअर इंडियाने खास 'Freedom Sale' आणला आहे.

फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
Air India Freedom Sale: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Air India Express ने एक खास 'फ्रीडम सेल' सुरू केला आहे. याअंतर्गत, फक्त १,२७९ रुपयांपासून तुम्ही देशांतर्गत आणि ४,२७९ रुपयांपासून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करू शकता. ही ऑफर ठराविक काळासाठी असल्यामुळे इच्छुकांनी लवकर लाभ घ्यावा.
कधी बुकिंग करता येणार?
'फ्रीडम सेल' अंतर्गत तुम्ही १९ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या प्रवासासाठी बुकिंग करू सकता. मात्र, ही सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला १५ ऑगस्टपर्यंत बुकिंग करावे लागेल. ही ऑफर आज(१० ऑगस्ट) पासून अधिकृत वेबसाइट (www.airindiaexpress.com) आणि एअरलाइनच्या मोबाइल अॅपवर लॉन्च सुरू झाली आहे. ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान इतर प्रमुख प्रवास बुकिंग प्लॅटफॉर्मवरदेखील हे उपलब्ध असेल.
5 million seats on offer this #FreedomSale! 🎉Celebrate the freedom to explore and create #MeaningfulConnections.
— Air India Express (@AirIndiaX) August 9, 2025
💺 Domestic fares from ₹1279
🌏 International fares from ₹4279
📅 Book by 15 Aug 2025 and travel till 31 Mar 2026#FlyAsYouAre and unlock member-exclusive perks… pic.twitter.com/6LLeBefKZO
'फ्रीडम सेल' अंतर्गत एअर इंडिया एक्सप्रेस देशांतर्गत उड्डाणांसाठी किमान १,२७९ रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी किमान ४,२७९ रुपये भाडे आकारत आहे. तसेच, इतर अनेक फायदे देखील मिळतील. अधिकृत वेबसाइटनुसार, 'गौरमायर' हॉट मील, केबिन आणि एक्स्ट्रा चेक-इन बॅगेज आणि एक्सप्रेस अहेड सारख्या सेवांवर २० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा
एअर इंडिया एक्सप्रेसने सांगितले की, सवलतीच्या दरात बेस फेअर, कर, विमानतळ शुल्क यासारखे शुल्क समाविष्ट नसतील. प्रवासी अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅप्लिकेशनवरून ऑनलाइन तिकिटे बुक करू शकतात. नेट बँकिंगद्वारे पेमेंट केल्यास एक्सप्रेस लाइटच्या भाड्यावर 'शून्य' शुल्क आकारले जाईल. मात्र, तिकीट रद्द केल्यास रक्कम परत केली जाणार नाही. मर्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर तिकिटे उपलब्ध आहेत. सवलतीच्या जागा बुक झाल्यानंतर फ्लाइट बुकिंगवर नियमित शुल्क लागू होईल.