एकीककडे अजित पवारांच्या झालेल्या विमान अपघातामुळे साऱ्यांनाच धडकी भरलेली असताना एअर इंडियाच्या लंडन-बंगळुरू विमानामध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या अहमदाबाद विमान अपघातावेळसारखाच बिघाड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एअर इंडियाने बोईंग ७८७ च्या फ्युअल कंट्रोल स्विचची पुन्हा तपासणी सुरु केली असून बोईंग कंपनीलादेखील याबाबत कळविण्यात आले आहे.
लंडन ते बेंगळुरू या विमान प्रवासादरम्यान बोईंग ७८७ ड्रीमलायनर या विमानाचा फ्यूल कंट्रोल स्विच आपोआप बंद झाला होता. उड्डाणावेळी ही बाब लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. परंतू, या घटनेमुळे अहमदाबाद विमान अपघाताच्या कारणावर शिक्कामोर्तब झाले आहे. एअर इंडियाने आपल्या ताफ्यातील सर्व बोईंग ७८७ विमानांच्या 'फ्यूल कंट्रोल स्विच'ची विशेष तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही जोखीम न पत्करता विमान कंपनीने हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे.
इंजिनला होणारा इंधन पुरवठा नियंत्रित करणाऱ्या या स्विचमध्ये बिघाड झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. अहमदाबाद विमान अपघातावेळी देखील हेच झाले होते. पायलट नो थर्स्ट असे बोलत होता आणि काही क्षणातच विमान कोसळले होते. विमान कंपनीने आणि अमेरिकेने ही शक्यता नाकारली होती, परंतू आता पुन्हा तेच घडल्याने बोईंग कंपनी आणि तिला वाचवू पाहणारी अमेरिकी मीडिया चांगलीच उघडी पडली आहे.
एअर इंडियाने बोईँगला या प्रकरणात मेल केला असून सखोल संशोधनाची मागणी केली आहे. भविष्यातही या विमानांसोबत अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता आहे. फ्युअल स्वीचमध्ये दोष आहे की प्रणालीमध्ये हे शोधणे आता बोईंगसमोर आव्हान असणार आहे. तोपर्यंत या विमानांतून प्रवास करणे प्रवाशांसाठी जोखमीचे ठरणार आहे
Web Summary : A fuel control switch malfunction, similar to the one during the Ahmedabad plane accident, occurred on an Air India London-Bengaluru flight. A potential disaster was averted. Air India has initiated inspections of Boeing 787 fuel switches and alerted Boeing. The incident highlights past safety concerns.
Web Summary : एयर इंडिया की लंदन-बेंगलुरु उड़ान में अहमदाबाद विमान दुर्घटना के समान ईंधन स्विच में खराबी आई। एक संभावित आपदा टल गई। एयर इंडिया ने बोइंग 787 ईंधन स्विच का निरीक्षण शुरू किया और बोइंग को सतर्क किया। घटना पिछली सुरक्षा चिंताओं को उजागर करती है।