MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:10 IST2025-06-12T15:45:50+5:302025-06-12T16:10:46+5:30

Air India Ahmedabad Plane Crash: विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानातील वैमानिकांनी MAYDAY... MAYDAY... MAYDAY… असा सिग्नल हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिला होता.

Air India Ahmedabad Plane Crash: MAYDAY... MAYDAY... MAYDAY…, the pilot gave this signal just moments after taking off | MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  

MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  

गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज दुपारी एक मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबादविमानतळावरूनएअर इंडियाच्या बी७८७ या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच ते विमानतळाबाहेरील परिसरात कोसळले. या विमानामध्ये प्रवासी आणि कर्मचारी मिळून २४२ होते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानातील वैमानिकांनी MAYDAY... MAYDAY... MAYDAY… असा सिग्नल हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिला होता. त्यामधून वैमानिकाने विमानातील गंभीर आणीबाणीचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर काही क्षणांतच हे विमान कोसळले.  

डीजीसीएने विमान अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी एअर इंडियाच्या बी७८७ या विमानाने अहमदाबादहून गेटविकच्या दिशेने उड्डाण केले होते.  मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळले. या विमानामधून एकूण २४२ जण प्रवास करत होते. त्यामध्ये २ वैमानिक आणि १० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल चालवत होते. तर त्यांच्यासोबत क्लाईव्ह कुंदर हे फर्स्ट ऑफिसर होते. सुमित सभरवाल यांना ८ हजार २०० तासांच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे. तर क्लाईव्ह यांना ११०० तासांचा अनुभव आहे.

या विमानाने अहमदाबाद विमानतळावरील २३ क्रमांकाच्या धावपट्टीवरून १ वाजून ३९ मिनिटांनी उड्डाण केलं होतं. उड्डाण करताच विमानातील वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला मेडे कॉल दिला होता. मात्र त्यानंतर विमानाकडून एटीसीला कुठलाही सिग्नल मिळाला नाही. तसेच काही क्षणांतच हे विमान खाली कोसळून आगीचे लोळ आकाशाकडे झेपावताना दिसले.

मेडे कॉल (Mayday Call) म्हणजे काय?
मेडे कॉल (Mayday Call) म्हणजे विमानात उदभवलेल्या आणीबाणीचा संदेश असतो. विमानामध्ये काही गंभीर परिस्थिती किंवा समस्या निर्माण होऊन प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर वैमानिकांकडून मेडे कॉल दिला जातो.  या कॉलच्या माध्यमातून वैमानिक एटीसी आणि जवळच्या विमानांना आपल्याला तातडीने मदतीची गरज असल्याचा संदेश देतो. मेडे कॉलच्या वेळी तीन वेळा Mayday...., Mayday...., Mayday... असा संदेश दिला जातो. 

Web Title: Air India Ahmedabad Plane Crash: MAYDAY... MAYDAY... MAYDAY…, the pilot gave this signal just moments after taking off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.