भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात, 2 वैमानिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 13:23 IST2023-12-04T12:46:07+5:302023-12-04T13:23:45+5:30

या घटनेत दोन वैमानिक गंभीर जखमी झाले आहेत.

air force trainer aircraft crashes in telangana | भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात, 2 वैमानिक जखमी

भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात, 2 वैमानिक जखमी

हैदराबाद : तेलंगणमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. भारतीय हवाई दलाच्या प्रशिक्षणार्थी विमानाला सोमवारी सकाळी अपघात झाला. ही घटना तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील आहे. या घटनेत दोन वैमानिक गंभीर जखमी झाले आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तामिळनाडूच्या दिंडीगुल येथे प्रशिक्षणादरम्यान सकाळी 8:55 च्या सुमारास पिलाटस विमानाचा अपघात झाला. हैदराबादजवळ दुंडिगल येथील हवाई दलाच्या अकादमी (AFA) येथून विमानाने उड्डाण केले. या घटनेनंतर हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही वैमानिकांना गंभीर दुखापत झाली आहे.

दरम्यान, वृत्तसंस्था एएनआयच्या मते, भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हैदराबादमधील हवाई दलाच्या अकादमीमधून नियमित प्रशिक्षण उड्डाण करताना आज सकाळी पिलाटस पीसी 7 एमके II विमान कोसळले. विमानातील दोन्ही वैमानिकांना गंभीर दुखापत झाली. मात्र, यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

Web Title: air force trainer aircraft crashes in telangana