शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

चीन-पाकशी एकत्र निपटण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज- बी. एस. धनोवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 8:31 AM

भारतीय हवाई दल चीन आणि पाकिस्तानबरोबर एकत्रित दोन हात करण्यासाठी तयार आहे, असे संकेत हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी दिले आहेत.

नवी दिल्ली- भारतीय हवाई दल चीन आणि पाकिस्तानबरोबर एकत्रित दोन हात करण्यासाठी तयार आहे, असे संकेत हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी दिले आहेत. हवाई दलाच्या 13 दिवसांच्या युद्धाभ्यासा(गगनशक्ती)नं निश्चित उद्दिष्ट्यांहून चांगले परिणाम मिळवले आहेत. हवाई दलाच्या तीन दशकातील हा युद्धाभ्यास 20 एप्रिलला संपन्न झाला.लढाऊ विमान, रोटरी विंग विमानांनी 11 हजारांहून जास्त वेळा उड्डाण करून युद्धासाठीच्या स्वतःच्या क्षमतेचं परीक्षण केलं आहे.  8 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या या युद्धाभ्यासात ब्रह्मोस आणि हार्पून अशा क्षेपणास्त्रांसह सुखोई आणि जग्वार सारख्या विमानांनी सहभाग नोंदवत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. आम्ही 48 तासांच्या आताच शस्त्रास्त्र आणि साधनांना एका भागातून दुस-या भागात नेण्याचं लक्ष्य पूर्ण केलं आहे, असंही बी. एस. धनोवा म्हणाले आहेत.हवाई दलानं गगनशक्ती युद्धसरावादरम्यान वाळवंट, लद्दाखसारखी उंच ठिकाणं, समुद्रात सराव केला आहे. हवाई दलाच्या अधिका-यांनी युद्धसरावादरम्यान मलाक्क्याची सामुद्रधुनी हल्ला केल्याच्या बातमीचं खंडन केलं आहे. परंतु हवाई दलानं 4000 किलोमीटर दूरवर असलेल्या मलाक्क्याची सामुद्रधुनीला लक्ष्य करण्याची क्षमता प्राप्त केल्याही माहिती वायुसेना प्रमुखांनी दिली आहे. नौदलानं दिलेल्या ठिकाणांनाच आम्ही टार्गेट केलं आहे. त्यात मलेशिया, सिंगापूर आणि इंडोनेशियाच्या समुद्री मार्गांचा समावेश नाही. याच वेळी हवाई दलानं नौदलाबरोबर संयुक्तरीत्या समुद्री आणि हवाई ऑपरेशनचा अभ्यास केला आहे. चीन हिंदी महासागरात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय हवाई दलाला युद्धसरावात मिळालेलं यश हा चीनसाठी एक प्रकारचा इशाराच आहे

टॅग्स :airforceहवाईदल