पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:52 IST2025-06-22T13:42:36+5:302025-06-22T13:52:25+5:30

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली.

AIMIM MP Asaduddin Owaisi reacted after the US attack on Iran | पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."

पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."

America Strikes In Iran:इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध असतानाच अमेरिकेने त्यात उडी घेतली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला आहे. अमेरिकन सैन्याने पूर्ण तयारीने या तळांवर बॉम्ब टाकले, ज्यामध्ये मुख्य लक्ष्य फोर्डो होते. दुसरीकडे इराणनेही या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जाईल असं म्हटलं आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही या हल्ल्यावर भाष्य केलं. पुढील ५ वर्षात इराण अणुबॉम्ब बनवेल असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी इराणच्या तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांवर प्रतिक्रिया दिली. "हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे उल्लंघन आहे. असे केल्याने, मला खात्री आहे की येत्या पाच वर्षांत इराण अणुशक्ती बनेल. हल्ल्यापूर्वी इराणने आपला साठा हलवला असेल. या हल्ल्यानंतर आता अनेक अरब देशांना वाटेल की त्यांना अणुक्षमतेची आवश्यकता आहे," असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

"आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आखाती आणि मध्य पूर्वेत १.६ कोटींहून अधिक भारतीय राहतात. जर त्या प्रदेशात युद्ध झाले तर त्याचा तेथे राहणाऱ्या भारतीयांवर गंभीर परिणाम होईल. भारतीय कंपन्यांनी या सर्व अरब देशांमध्ये किंवा आखाती देशांमध्ये गुंतवणूक केली आहे. परदेशी गुंतवणुकीचा मोठा भाग याच प्रदेशातून येतो. इराणकडे अण्वस्त्रे असल्याची अफवा पसरवली गेली आहे. इराकमध्येही असेच केले गेले. तिथूनही काही बाहेर आले नाही," असेही असदुद्दीन ओवैसींनी म्हटलं.

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायल-इराण युद्ध भडकण्याची शक्यता वाढली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की ते इराणविरुद्धच्या युद्धात इस्रायलला पाठिंबा देण्याचा निर्णय दोन आठवड्यात घेतील. मात्र त्यांनी हा निर्णय अवघ्या दोन दिवसांत घेतला आणि रविवारी पहाटे, अमेरिका युद्धात सामील झाली आणि त्यांनी इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला.
 

Web Title: AIMIM MP Asaduddin Owaisi reacted after the US attack on Iran